AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओडिशामध्ये 3 रेल्वे गाड्यांची टक्कर, भारतीयांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणणारा सर्वात मोठा भीषण अपघात

चेन्नई येथून कोरोमंडल एक्सप्रेस ही पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकाच्या दिशेला निघाली होती. या दरम्यान ओडिशाच्या बहनागा रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली. तब्बल तीन रेल्वे गाड्यांची टक्कर झालीय. त्यामुळे मोठा हाहाकार उडाला आहे.

ओडिशामध्ये 3 रेल्वे गाड्यांची टक्कर, भारतीयांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणणारा सर्वात मोठा भीषण अपघात
| Updated on: Jun 02, 2023 | 11:50 PM
Share

बालासोर : ओडिशाच्या बालासोर येथे आज खूप मोठा रेल्वे अपघात घडलाय. सुरुवातीला कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी यांच्यात टक्कर झाल्याने हा अपघात घडला अशी माहिती समोर येत होती. पण आता जसजसी वेळ पुढे सरकत जातेय तसतशी वेगवेगळी महत्त्वपूर्ण नवी माहिती समोर येऊ लागली आहे. बालासोरमध्ये दोन गाड्यांची टक्कर नाही तर तब्बल तीन रेल्वे गाड्यांची टक्कर झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रचंड मोठा हाहाकार उडाला आहे. आतापर्यंत 50 जणांच्या मृत्यूची माहिती समोर येते. घटनास्थळी प्रचंड खळबळ उडाली आहे.

बचाव पथकाचं कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. शेकडो जखमींना रुग्णालयात नेलं जात आहे. अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी काम करत आहेत. देशभरातून वेगवेगळी पथक ओडिशाला मदतीसाठी रवाना झाले आहेत. दुर्घटना खूप मोठी आहे. एका गाडीत 1600 प्रवाशी होते, अशी माहिती मिळत आहे. अपघात तीन रेल्वे गाड्यांचा आहे. त्यामुळे नुकसान खूप मोठं आहे. भारताच्या इतिहासातील ही सर्वात भयानक रेल्वे दुर्घटना आहे.

संबंधित घटना ही शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली. चेन्नई येथून कोरोमंडल एक्सप्रेस ही पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकाच्या दिशेला निघाली होती. या दरम्यान ओडिशाच्या बहनागा रेल्वे स्थानकाजवळ आधी हावडा एक्सप्रेस ही मालगाडीला धडकली. ही दुर्घटना खूप मोठी होती. त्यानंतर लगेच मागून आलेली कोरोमंडल एक्सप्रेस या दोन अपघातग्रस्त गाड्यांना धडकली. त्यामुळे घटनास्थळी मोठा हाहाकार उडाला. कोरोमंडल एक्सप्रेसचे अनेक डब्बे रुळाखाली घसरले. चार ते पाच रेल्वे डब्बे अक्षरश: पलटी झाले.

मृतकांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर

दरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव गोवा येथून ओडिशा येथे अपघातस्थळी रवाना झाले आहेत. त्यांनी मृतकांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केलीय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. या घटनेमुळे उद्याचा मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 300 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींच्या मदतीसाठी प्रशासनाचे युद्ध पातळीवर काम सुरु आहे.

हेल्पलाईन नंबर जारी

रेल्वेने वेगवेगळ्या स्थानकांवरून हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. या क्रमांकांमध्ये, 033 26382217, खरगपूर हेल्पलाइन क्रमांक 8972073925/9332392339, बालासोर हेल्पलाइन क्रमांक – 8249591559/7978418322 आणि शालीमार हेल्पलाइन क्रमांक 9903370746 हावरा स्टेशनवरून जारी करण्यात आला आहे.

चेन्नई सेंट्रलने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत, प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष बूथही उघडले जात आहेत. या क्रमांकांवर संपर्क साधला जाऊ शकतो – 044- 25330952, 044-25330953 आणि 044-25354771.

या अपघातावर शोक व्यक्त करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हे हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.