ADR Report : 4 वर्षात तब्बल 170 आमदारांनी काँग्रेसला ठोकला रामराम!

विविध राज्यांमधील निवडणुकीवेळी काँग्रेसच्या शेकडो आमदारांनी पक्षाला रामराम केल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. 2016 ते 2020 या चार वर्षात काँग्रेस पक्ष सोडणाऱ्या आमदारांचा आकडा तब्बल 170 आहे.

ADR Report : 4 वर्षात तब्बल 170 आमदारांनी काँग्रेसला ठोकला रामराम!
Congress flag

नवी दिल्ली : देशात भाजपचं सरकार आल्यानंतर काँग्रेसला मोठी घरघर लागल्याचं चित्र संपूर्ण देशानं पाहिलं. विविध राज्यांमधील निवडणुकीवेळी काँग्रेसच्या शेकडो आमदारांनी पक्षाला रामराम केल्याचं एका रिपोर्टमधून समोर आलं आहे. 2016 ते 2020 या चार वर्षात काँग्रेस पक्ष सोडणाऱ्या आमदारांचा आकडा तब्बल 170 आहे. तशी माहिती निवडणुका आणि राजकारणावर काम करणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स अर्थात ADR या संस्थेनं केला आहे.(According to ADR report, 170 Congress MLAs left the party between 2016 and 2020)

कुणाला झटका, कुणाला फायदा?

2016 ते 2020 या चार वर्षाच्या काळात विविध राज्यांमधील काँग्रेसच्या तब्बल 170 आमदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. तर भाजपच्या फक्त 18 आमदारांनी पक्ष सोडल्याचं ADR रिपोर्टमधून समोर आलं आहे. 2016 ते 2020 या दरम्यान आपल्या पक्षाला राम राम ठोकत पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या 405 आमदारांपैकी 182 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 28 आमदार काँग्रेसमध्ये गेले तर 25 आमदार तेलंगन राष्ट्र समितीत प्रवेश करते झाले.

2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या 5 खासदारांनी फारकत घेत अन्य पक्षात प्रवेश केला. तर 2016 ते 2020 दरम्यान काँग्रेसच्या 7 राज्यसभा सदस्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. चार वर्षात काँग्रेसच्या 170 आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत अन्य पक्षात प्रवेश केला. तर भाजपच्याही 18 आमदारांनी भाजपशी फारकत घेत दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला.

5 राज्यात आयाराम-गयारामांमुळे सत्तापालट

महत्वाची बाब म्हणजे मध्य प्रदेश, मणिपूर, गोवा, अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आमदारांनी अन्य पक्षात उड्या घेतल्यामुळे तिथलं सरकार बदललं. यातील गोवा, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील सत्ता बदलाची चर्चा देशभर सुरु होती. ADR रिपोर्टनुसार, 2016 ते 2020 दरम्यान पक्ष बदलून राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या 16 खासदारांपैकी 10 खासदार भाजपमध्ये प्रवेश करते झाले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये भाजपची मेगा भरती

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहत आहेत. तिथलं ममता बॅनर्जी यांचं सरकार उलथवून टाकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यात कधीकाळी ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय असलेल्या नेतेमंडळींचाही समावेश आहे. इतकच नाही तर निवडणूक जाहीर झाल्यानंतर TMCच्या 5 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

संबंधित बातम्या :

Kerala Election 2021 : केरळमध्ये काँग्रेसला मोठा झटका, पक्ष नेतृत्वावर आगपाखड करत पीसी चाको यांचा राजीनामा

West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जींना बसणाऱ्या धक्क्यांची मालिका सुरुच, ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक आमदार भाजपात

According to ADR report, 170 Congress MLAs left the party between 2016 and 2020

Published On - 8:10 pm, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI