‘भारत लोकशाहीप्रधान देश राहिला नाही’, राहुल गांधींचा गंभीर आरोप; राहुल गांधी ‘एजंट’, भाजपचा पलटवार

राहुल गांधी यांनी एक ट्वीट करुन भारत आता लोकशाहीप्रधान देश राहिला नाही, असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी एका विदेशी इन्स्टिट्यूटचा हवाला दिला आहे.

'भारत लोकशाहीप्रधान देश राहिला नाही', राहुल गांधींचा गंभीर आरोप; राहुल गांधी 'एजंट', भाजपचा पलटवार
Rahul Gandhi

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी एक ट्वीट करुन भारत आता लोकशाहीप्रधान देश राहिला नाही, असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी एका विदेशी इन्स्टिट्यूटचा हवाला दिला आहे. राहुल गांधी यांच्या या टीकेला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी हे तर एजंट असल्याची टीका भाजपनं केली आहे.(Rahul Gandhi’s criticism of the Modi government, citing a report by a Canadian organization)

राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये एक फोटोही शेअर केला आहे. पाकिस्तानप्रमाणेच भारतही ऑटोक्रेटिक आहे. भारताची स्थिती बांग्लादेशपेक्षाही खराब आहे, असं या फोटोमध्ये लिहिलं गेलं आहे. स्वीडनमधील एका इन्स्टिट्यूटचा डेमोक्रसी रिपोर्टचा हवाला राहुल गांधी यांनी दिला आहे.

यापूर्वी स्विडनमधील व्ही-डेम इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात दावा केला आहे की, “भारत आता ‘इलेक्टोरल डेमोक्रसी’ राहिला नाही. तर भारताचं आता ‘इलेक्टोरल ऑटोक्रॅसी’च्या रुपात वर्गीकरण केलं जाऊ शकतं. जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान असलेला भारत आता इलेक्टोरल ऑटोक्रॅसी बनला आहे”.

भाजपचा पलटवार

भाजप नेते राकेश सिन्हा यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पाश्चिमात्य देशातील नवसाम्राज्यवादी शक्तींना भारताची वाढती ताकद, प्रतिष्ठा आणि विश्वसनियता सहन होत नाही. त्यांच्यासाठी भारतातील एका एजंटच्या रुपात राहुल गांधी काम करत आहेत. दोन गांधींमध्ये अशाप्रकारचं अंतर आहे. महात्मा गांधी कॅथरिन मेयो यांनी एका पुस्तक मदर इंडिया लिहिलं होतं. ते पुस्तक म्हणजे टगटर की रिपोर्ट’ असल्याचं महात्मा गांधी म्हणाले होते. आता कॅनडातील एका संस्थेनं जारी केलेल्या रिपोर्टला राहुल गांधी पुढे करत आहेत. यावरुन हे दिसून येतं की, राहुल गांधी पाश्चिमात्य देशांच्या शक्तींसोबत मिळून भारताच्या सार्वभौमत्वाची अवहेलना असल्याची टीका भाजपने केलीय.

संबंधित बातम्या :

राहुल गांधींनी शब्द पाळला, 12 वर्षाच्या मुलाला स्पोर्ट्स शूज पाठवले!

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री बनले असते, आता भाजपात बॅक बेंचर – राहुल गांधी

Rahul Gandhi’s criticism of the Modi government, citing a report by a Canadian organization

Published On - 7:25 pm, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI