फक्त तरुणांवर लक्ष्य केंद्रित करणं माझी चूक, राहुल गांधींकडून भविष्यातील टीमबाबत सूचक विधान

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या राजकारणाच्या शैलीत महत्त्वाचा बदल करण्याचा सूचक इशारा दिलाय.

फक्त तरुणांवर लक्ष्य केंद्रित करणं माझी चूक, राहुल गांधींकडून भविष्यातील टीमबाबत सूचक विधान
Rahul Gandhi
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Mar 09, 2021 | 5:05 PM

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या राजकारणाच्या शैलीत महत्त्वाचा बदल करण्याचा सूचक इशारा दिलाय. भारतीय युवक काँग्रेसला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसमध्ये तरुणांवर खूप जास्त लक्ष्य केंद्रित करणे ही आपली चूक असल्याचं म्हटलंय. त्यांच्या या विधानामुळे भविष्यात राहुल गांधी आपली राजकीय पद्धत बदलणार असल्याची चर्चा आहे. भारतीय युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना राहुल गांधी यांनी राजकारणात विश्वास, निष्ठा आणि पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहण्यावर भर दिला (Big statement of Rahul Gandhi on his upcoming political priorities in Congress).

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या विचारसरणीशी बांधिल लोकांना अधिक महत्त्व देण्याचा सूचक इशारा दिलाय. विशेष म्हणजे आगामी काळात जूनमध्ये राहुल गांधी पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसचं नेतृत्व करण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यावेळी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे. त्यामुळेच अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर टीम राहुलमध्ये कोण असणार यासाठीचा सूचक इशारा राहुल गांधींनी दिलाय. राहुल गांधींनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आता आगामी काळात ते काँग्रेसच्या विचारसरणीशी निष्ठावान असणाऱ्यांनाच प्राधान्य देणार असं दिसतंय.

काँग्रेसमध्ये तरुणांना संधी देण्यात राहुल गांधींचा महत्त्वाचा वाटा

राहुल गांधी यांनी 2004 मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी सुरुवातीला तिकिट देण्यापासून विविध प्रमुख विभाग आणि पक्षाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये तरुणांना संधी देण्यासाठी ताकदीने प्रयत्न केले. काँग्रेसमध्ये तरुणांचा भरणा करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचंही बोललं गेलं. त्यासाठी त्यांचं कौतुकही झालं. मात्र, मध्यतरीच्या काळात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारख्या युवा नेत्यांच्या बंडखोरीनंतर राहुल गांधी यांनी आपला पवित्रा बदलल्याची चर्चा आहे.

‘जे लोक पक्षाशी मोठ्या काळापासून एकनिष्ठ आहेत त्यांना भविष्यात संधी’

राहुल गांधींनी भारतीय युवक काँग्रेसच्या नेत्यांना पक्षाच्या खऱ्या शक्तीची माहिती देताना म्हटलं, “महात्मा गांधी म्हटलं होतं की राजकारणाचा अर्थ विश्वास आहे आणि आज देशात तो विश्वास असणं आवश्यक आहे. भारतीय युवक काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहावं. जे लोक पक्षाशी मोठ्या काळापासून एकनिष्ठ आहेत त्यांना भविष्यात संधी दिली जाईल.”

‘काँग्रेसमध्ये परतायचं असेल त्यांना दरवाजे नेहमी खुले’

“काँग्रेसमध्ये कुणालाही परतायचं असेल तर त्यासाठी काँग्रेसचे दरवाजे नेहमी खुले असतील. काँग्रेस हा एक महासागर आहे. ज्याला पक्षात परत यायाचं आहे त्यानं यावं, त्यांना तसं करण्याची परवानगी आहे. मात्र, सत्तेत नेहमीच त्या लोकांना संधी मिळेल जे लोक मागे राहिलेत आणि पक्षाच्या विचारसरणीशी कटिबद्ध आहेत,” असंही राहुल गांधींनी नमूद केलं.

हेही वाचा :

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री बनले असते, आता भाजपात बॅक बेंचर – राहुल गांधी

ED, CBI आणि आयकर विभागाला सरकार आपल्या बोटांवर नाचवतं, राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

Rahul Gandhi : ‘होय, आणीबाणी चुकच होती!’, काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून पहिल्यांदाच जगजाहीर कबुली

व्हिडीओ पाहा :

Big statement of Rahul Gandhi on his upcoming political priorities in Congress

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें