राहुल गांधींनी शब्द पाळला, 12 वर्षाच्या मुलाला स्पोर्ट्स शूज पाठवले!

आता राहुल गांधी अजून एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. राहुल गांधी यांनी कन्याकुमारीतील एका 12 वर्षीय मुलाला एक शब्द दिला होता आणि त्यांनी तो पाळला आहे.

राहुल गांधींनी शब्द पाळला, 12 वर्षाच्या मुलाला स्पोर्ट्स शूज पाठवले!

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी गेल्या काही दिवसात आपल्या राजकीय नाही तर अन्य गोष्टींमुळे जास्त चर्चेत आहेत. मग तो समुद्रात उडी घेत लुटलेला पोहण्याचा आनंद असो की, विद्यार्थ्यांसोबतच्या संवादाच्या कार्यक्रमात मारलेले जोर. आता राहुल गांधी अजून एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. राहुल गांधी यांनी कन्याकुमारीतील एका 12 वर्षीय मुलाला एक शब्द दिला होता आणि त्यांनी तो पाळला आहे.(Rahul Gandhi sends sports shoes to 12-year-old Felix from Kanyakumari)

राहुल गांधी यांनी एन्टनी फेलिक्स या मुलाला स्पोर्ट्स शूज देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार राहुल गांधी यांनी त्या मुलाला स्पोर्ट्स शूज पाठवले आहेत. त्याचं झालं असं की राहुल गांधी तामिळनाडू दौऱ्यावर होते. त्यावेळी कन्याकुमारीमध्ये त्यांची फेलिक्ससोबत भेट झाली होती. फेलिक्स त्यावेळी पायात काहीही न घालता मुख्यमंत्री के. कामराज यांचं पोस्टर घेऊन उभा होता. त्यावेळी राहुल गांधी यांची नजर त्याच्यावर पडली. त्यावेळी राहुल यांनी आपला ताफा रस्त्याच्या कडेला एका चहाच्या स्टॉलवर चहा पिण्यासाठी थांबवला होता.

राहुल गांधींच्या फेलिक्सशी गप्पागोष्टी

त्यावेळी राहुल यांनी फेलिक्सला जवळ घेऊन, त्याच्या खांद्यावर हात ठेवत चहाच्या स्टॉलकडे गेले. त्यावेळी फेलिक्ससोबत त्यांनी गप्पागोष्टीही केल्या. त्यावेळी राहुल यांनी त्याच्या आवडीनिवडी विचारल्या. त्यावेळी आपल्याला धावायला आवडत असल्याचं फेलिक्सने सांगितलं होतं. मग तू पायात काहीही न घालताच धावतो का? असा प्रश्न राहुल यांनी फेलिक्सला विचारला होता.

त्याचबरोबर तुला लवकरच स्पोर्ट्स शूज पाठवून देतो असा शब्दही राहुल यांनी फेलिक्सला दिला होता. तसंच ट्रेनिंगसाठी एखाद्या अकॅडमीत दाखल होण्यासाठी मदत करतो, असं आश्वासनही राहुल यांनी फेलिक्सला दिलं. दरम्यान, राहुल यांनी पाठवलेले स्पोर्ट्स शूज पाहून फेलिक्सच्या गालावर हसू उमटल्याचं पाहायला मिळालं.

संबंधित बातम्या :

फक्त तरुणांवर लक्ष्य केंद्रित करणं माझी चूक, राहुल गांधींकडून भविष्यातील टीमबाबत सूचक विधान

Rahul Gandhi | सुरक्षेचं कवच भेदत राहुल गांधींची समुद्रात उडी, घेतला मासेमारीचा अनुभव

Rahul Gandhi sends sports shoes to 12-year-old Felix from Kanyakumari

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI