Rahul Gandhi | सुरक्षेचं कवच भेदत राहुल गांधींची समुद्रात उडी, घेतला मासेमारीचा अनुभव

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 0:01 AM, 25 Feb 2021
Rahul Gandhi | सुरक्षेचं कवच भेदत राहुल गांधींची समुद्रात उडी, घेतला मासेमारीचा अनुभव
राहुल गांधी यांनी अशा प्रकारे पाण्यात उतरुन मासेमारी केली.

तिरुअनंतपुरम : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहेत. राहुल गांधी आजकाल टी शर्ट, जीन्स पॅन्ट अशा मॉर्डन लूकमध्ये दिसतायत. राहुल सध्या केरळमध्ये असून ते तेथील जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र, सध्या राहुल गांधी यांची एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चा होत आहे. केरळमधील कोल्लम येथे त्यांनी थेट पाण्यात उतरुन  मच्छीमारांसोबत मासेमारी केली. मासेमारी कशी केली जाते याबाबत जाणून घेतले. सुरक्षा रक्षकांचा ताफा भेदून त्यांनी मच्छीमारांसोबत पाण्यात मासेमारी केल्यामुळे त्यांची सगळीकडे चर्चा होत आहे. (rahul gandhi jumps into sea and caught fishes with the fishermen in kerala)

राहुल गांधी सध्या केरळमध्ये आहेत. केरळमधील जनतेशी ते संवाद साधत आहे. देशातील एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळख असल्यामुळे राहुल गांधी यांच्या चारही बाजूंना सुरक्षा रक्षक असतात. राहुल गांधी जिथे जातील तिथे या सुरक्षा रक्षकांकडून त्यांना संरक्षण दिले जाते. मात्र सध्या केरळच्या दौऱ्यावर असल्यामुळे राहुल गांधी सुरक्षेची तमा न बाळगता तेथील जनतेशी समरस होण्याचा प्रयत्न करत आहेत.

मासेमारीचा अनुभव घेतला

ते केरळमधील जनतेशी मुक्तपणे संवाद साधत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राहुल गाधी यांनी थेट पाण्यात उतरुण कोल्लम येथील स्थानिक मच्छीमारांसोबत मासेमारी केली. त्यांनी पाण्यामध्ये उतरुन मासेमारी नेमकी कशी करतात, हे अनुभवले. त्यांनी स्व:तसुद्धा मासेमारी केली. यावेळी बोटीतून उडी घेताना, तसेच समुद्रात मच्छीमारांसोबत मासेमारी करतानाचे त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

राहुल गांधी यांनी अशा प्रकारे समुद्रात उडी घेतली.

तुमची गर्लफ्रेंड आहे का?

राजकारणात राहुल गांधी यांचा भाग्योदय कधी होणार याप्रमाणेच त्यांचे लग्न कधी होणार, याची उत्सुकता अनेकांना आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आजवर आपल्या लव्ह लाईफबद्दल मौन बाळगणेच पसंत केले आहे. मात्र, पुदुचेरीत झालेल्या एका कार्यक्रमात एका लहान मुलीने सर्वांदेखत राहुल गांधी यांना ‘तुमची गर्लफ्रेंड आहे का?’, असा प्रश्न विचारला. त्यावर राहुल गांधी यांनी दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल यांनी  “या प्रश्नाचे उत्तर मी नंतर कधीतरी देईन”, असे सांगत वेळ मारून नेली.

तुमची कोणी गर्लफ्रेंड आहे का? भर कार्यक्रमात मुलीचा प्रश्न, राहुल गांधी म्हणाले…