तुमची कोणी गर्लफ्रेंड आहे का? भर कार्यक्रमात मुलीचा प्रश्न, राहुल गांधी म्हणाले…

या कार्यक्रमात लहान मुलं प्रश्न विचारताना राहुल गांधी यांना 'सर' म्हणून हाक मारत होती. तेव्हा राहुल गांधी यांनी म्हटले की, माझे नाव 'सर' नाही. तुम्ही मला 'राहुल अण्णा' म्हणा, अशी सूचना राहुल यांनी केली. | Rahul Gandhi

तुमची कोणी गर्लफ्रेंड आहे का? भर कार्यक्रमात मुलीचा प्रश्न, राहुल गांधी म्हणाले...
एका लहान मुलीने राहुल गांधींच्या वर्मावर बोट ठेवले. तुमची कोणी गर्लफ्रेंड आहे का, असा प्रश्न तिने विचारला. या प्रश्नानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला, सर्वांच्या नजरा राहुल गांधी काय बोलणार याकडे लागल्या होत्या.

पुदुचेरी: राजकारणात राहुल गांधी यांचा भाग्योदय कधी होणार याप्रमाणेच त्यांचे लग्न कधी होणार, याची उत्सुकता अनेकांना आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आजवर आपल्या लव्ह लाईफबद्दल मौन बाळगणेच पसंत केले आहे. मात्र, पुदुचेरीत नुकत्या झालेल्या एका कार्यक्रमात एका लहान मुलीने सर्वांदेखत राहुल गांधी यांना ‘तुमची गर्लफ्रेंड आहे का?’, असा प्रश्न विचारला. त्यावर राहुल गांधी यांनी दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Girl asked Rahul Gandhi do you have girlfriend)

राहुल गांधी हे पुदुचेरीत एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांनी नेहमीचा पांढरा सदरा-कुर्ता हा पोशाख बाजूला सारून जीन्स आणि टी-शर्ट घातला होता. यावेळी एका लहान मुलीने राहुल गांधींच्या वर्मावर बोट ठेवले. तुमची कोणी गर्लफ्रेंड आहे का, असा प्रश्न तिने विचारला. या प्रश्नानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला, सर्वांच्या नजरा राहुल गांधी काय बोलणार याकडे लागल्या होत्या. मात्र, या प्रश्नाचे उत्तर मी नंतर कधीतरी देईन, असे सांगत राहुल गांधी यांनी वेळ मारून नेली.

‘मला सर म्हणू नका’

या कार्यक्रमात लहान मुलं प्रश्न विचारताना राहुल गांधी यांना ‘सर’ म्हणून हाक मारत होती. तेव्हा राहुल गांधी यांनी म्हटले की, माझे नाव ‘सर’ नाही. तुम्ही मला ‘राहुल अण्णा’ म्हणा, अशी सूचना राहुल यांनी केली. पुदुचेरीत भाजपने काँग्रेसच्या आमदारांना गळाला लावल्यामुळे नुकतेच काँग्रेसचे-द्रमुक आघाडीचे सरकार कोसळले होते. मात्र, पुदुचेरीत शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना या घटनेचा कुठलाही ताण राहुल गांधी यांच्यावर दिसून आला नाही.

‘राजकारण सोडून इतर क्षेत्रांमध्ये तुमचे मित्र आहेत का?’

यावेळी राहुल गांधी यांना राजकीय क्षेत्राव्यतिरिक्त इतर ठिकाणी तुमचे मित्र आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राहुल गांधी यांनी म्हटले की, माझे खूप मित्र आहेत. काहीजण राजकारणात आहेत, काहीजण इतर क्षेत्रात आहेत. काहीजण मला राजकीय वैरी मानतात. मात्र, मी त्यांनाही मित्रच समजतो, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

राहुल गांधींना ‘हम दो हमारे दो’ म्हणायचं असेल तर आधी लग्न करावं लागेल : रामदास आठवले

(Girl asked Rahul Gandhi do you have girlfriend)

Published On - 12:41 pm, Wed, 24 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI