विमानातून कोसळून मृत्यू झालेल्या तिघांमध्ये अफगाणिस्तानचा नॅशनल फुटबॉलपटू, अन्वरच्या मृत्यूने जगभरात हळहळ

| Updated on: Aug 20, 2021 | 12:00 AM

अफगाणिस्तान सोडण्यासाठी अमेरिकी सैन्याच्या विमानाला लटकलेल्या तिघांचा पडून मृत्यू झाल्यामुळे जगभरात खळबळ उडाली होती. मात्र, विमानातून पडून मृत्यू झालेल्या या तिघांविषयी आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. खाली पडलेल्या तिघांपैकी एकजण अफगाणिस्तानच्या नॅशनल फुटबॉल टीमचा एक खेळाडू असल्याचे म्हटले जात आहे.

विमानातून कोसळून मृत्यू झालेल्या तिघांमध्ये अफगाणिस्तानचा नॅशनल फुटबॉलपटू, अन्वरच्या मृत्यूने जगभरात हळहळ
Zaki Anwar
Follow us on

काबुल : अफगाणिस्तान सोडण्यासाठी अमेरिकी सैन्याच्या विमानाला लटकलेल्या तिघांचा पडून मृत्यू झाल्यामुळे जगभरात खळबळ उडाली होती. मात्र, विमानातून पडून मृत्यू झालेल्या या तिघांविषयी आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. खाली पडलेल्या तिघांपैकी एकजण अफगाणिस्तानच्या नॅशनल फुटबॉल टीमचा खेळाडू असल्याचे म्हटले जात आहे. एरियाना न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार या फुटबॉलपटूचे नाव झाकी अन्वर (Zaki Anwar) असे आहे. अन्वर हा अफगाणिस्तानच्या फुटबॉल टीमचा खेळाडू होता. (Afghanistan national team Football Zaki Anwar died in fall from america airplane on 15 august)

15 ऑगस्ट रोजी काबुल विमानतळावर लोकांची गर्दी

तालिबान्यांनी अफगाणिस्तानातील प्रमुख शहरे तसेच काबुलवर कब्जा मिळवल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. तालिबानी सत्तेत राहण्याची इच्छा नसणारे नागरिक जमेल त्या मार्गाने अफगाणिस्तान सोडण्याची तयारी करत आहेत. येथील लोकांमध्ये निर्माण झालेल्या दहशतीची प्रचिती 15 ऑगस्ट रोजी आली. 15 ऑगस्ट रोजी काबुल विमानतळावर अफगाणी नागरिक जमेल त्या विमानात बसून अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्न करत होते. काही लोक तर विमानाला चक्क लटकले होते.

अफगाणिस्तानचा फुटबॉलपटू झाकी अन्वरचा मृत्यू

अमेरिकी सैनिकांच्या विमानाच्या बाबतीही असंच घडलं. 15 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या सैनिकी विमानात क्षमतेपेक्षा जास्त अफगाणी नागरिक चढले. काही लोक तर विमानाला लटकलेसुद्धा. हे विमान नंतर हवेत झेपावल्यानंतर तिघे विमातून खाली कोसळले. खाली पडून मृत्यू झालेल्या या तिघांपैकी एक जण अफगाणिस्तानचा फुटबॉलपटू झाकी अन्वर आहे. एरियाना न्यूज एजन्सीने ही माहिती दिली आहे.

Afghanistan’s tragedy right now in Kabul international airport: Afghan youth on the engine of American plane to leave the country. pic.twitter.com/CoTS8sq9c3

— Muslim Shirzad (@MuslimShirzad) August 16, 2021

विमानतळावर नागरिकांची झुंबड

दरम्यान, अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काही काळातचं तालिबान सक्रिय झालं. अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा तालिबानने ताबा घेतला. राजधानी काबुलसह संपूर्ण देश आता तालिबानच्या ताब्यात आहेत. राष्ट्रपती अशरफ गनी हे मात्र स्वत:च्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांना सोबत घेऊन देश सोडून पळून गेले आहेत. अशरफ गनी यांनी विश्वासघात केल्याची भावना अफगाण लोक व्यक्त करतायत. तर, अनेक नागरिक तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत.

इतर बातम्या :

भारत-अफगाणिस्तान व्यापार ठप्प, आयात-निर्यातीसाठी बंदी; तालिबानचा फतवा

काश्मीरमध्ये भाजप नेत्याची अतिरेक्यांकडून हत्या; सर्च ऑपरेशन सुरू

(Afghanistan national team Football Zaki Anwar died in fall from america airplane on 15 august)