AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खान सर यांच्या कोचिंगला देखील लागला टाळा, दिल्ली कोचिंग सेंटर अपघातानंतर कारवाई

दिल्लीत आएएस कोचिंग सेंटरमध्ये तीन विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याने पाटणा येथील खान जी.एस. सेंटरची देखील चौकशी करण्यात आली तेव्हा त्यातही अनेक त्रूटी आढळल्या आहेत. पाटणा कोचिंग चौकशी नंतर डीव्हीजनल दंडाधिकारी चंद्रशेखऱ सिंह यांनी सर्व कोचिंग संचालकांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीत एसएसपी, नगर आयुक्त,शिक्षण विभागाचे अधिकारी हजर होते.

खान सर यांच्या कोचिंगला देखील लागला टाळा, दिल्ली कोचिंग सेंटर अपघातानंतर कारवाई
patana khan sir G.S. Research
| Updated on: Jul 31, 2024 | 5:28 PM
Share

दिल्लीत आयएएस कोचिंग सेंटरमध्ये पावसाच्या पाणी साचून तीन आयएएसचे प्रशिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आता सरकारला उशीरा जाग आली आहे. त्यामुळे देशभरातील आयएएस प्रशिक्षण केंद्रांवर धाडी सुरु झाल्या आहेत. दिल्लीतील घटनेने सर्वच कथित आयएएस ट्रेनिंग सेंटर सरकारच्या रडारवर आली आहेत. बिहारच्या पाटणा येथील खान जी.एस. रिसर्च  कोचिंग सेंटरला जिल्हा प्रशासनाने नोटीस चिकटवली आह. तसेच कोचिंग बंद करण्यास सांगण्यात आले आहे. आता या प्रकरणात खान सर यांना देखील नोटीस पाठविली जाणार आहे. अनेक त्रूटी या क्लास सेंटरमध्ये आढळल्याने ते सिलबंद करण्यात आले आहे.

बिहार प्रशासनच्यामते पाटणा येथील कोचिंग सेंटरमध्ये पुरेशी हवा खेळती नसल्याचे उघडकीस आले आहे. आत शिरण्याचे आणि बाहेर पडण्याचे चांगली व्यवस्था नसल्याचे देखील आढळले आहे. येथील बैठक व्यवस्था तसेच क्लासची इमारतीतील जागा अशा अनेक त्रूटी आढळल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी समिती नेमली होती. त्या समितीला अनेक त्रूटी आढळल्या आहेत. बिहार कोचिंग रेग्युलेशन अॅक्टचे पालन न केल्याने ही कारवाई झाल्याचे आढळले आहे.

खान सरांचे त्रूटी करण्याचे आश्वासन

या प्रकरणात खान सरांनी पाटणा येथील त्यांच्या कोचिंग सेंटरमधील सर्व त्रूटी काही दिवसात दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. आपण येत्या दोन दिवसात नोटीसीला उत्तर देऊ असे खान सरांनी आश्वासन दिले आहे. दिल्लीतील कोंचिग सेंटरमध्ये पावसाच्या पुराचे पाणी साचल्यानंतर तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर पाटणा प्रशासनाने एक्शन केले आहे. उप विभागीय न्यायदंडाधिकारी ( एसडीएम ) श्रीकांत कुंडलिक खांडेकर पथकासोबत कोचिंग सेंटरवर कारवाई करीत आहेत.

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.