AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS होण्याचं स्वप्नं भंगलं, पुराने घेतला श्रेयाचा बळी, 2 सहकारीही दगावले

या प्रकरणाची न्याय दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी कोचिंगमध्ये आयएएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असून या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

IAS होण्याचं स्वप्नं भंगलं, पुराने घेतला श्रेयाचा बळी, 2 सहकारीही दगावले
| Updated on: Jul 28, 2024 | 1:41 PM
Share

आयएएस ही देशातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. त्यामुळे या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी घरदार सोडून मुलं परराज्यात शिकायला जातात. राजस्थानातील कोटा आणि दिल्ली सारख्या कोचिंग क्लासची महागडी फि भरुन पालक मुलांना आएएस करायचं यासाठी आयुष्यभराची कमाई दावणीला लावत असतात.  दिल्लीतील राव आयएएस कोचिंग सेंटरमध्ये जोरदार पावसाने पाणी भरल्याने क्लासमधून बाहेर पडता न आल्याने तीन मुलांचा हकनाक बळी गेला आहे. तुम्ही म्हणाल नैसर्गिक संकटात सरकार तरी काय करणार ? परंतू क्लासला मंजूरी कशी काय दिली. बेसमेंटमध्ये पाणी साचणाऱ्या ठिकाणी बाहेर पडण्याचे मार्ग नसताना  कोचिंग सेंटर कसे चालविले जाते ?  या हलगर्जीला  जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला आहे.

टीव्हीवर बातम्या लागलेल्या. त्यात आपल्या भाचीचा मृत्यू झाल्याचे समजल्याचे श्रेया यादव यांचे काका धर्मेंद्र यादव यांनी म्हटले आहे. धर्मेंद यादव रात्रीच उत्तर प्रदेशातून दिल्लीत पोहचले परंतू त्यांच्या लाडक्या भाचीचा मृतदेह अजून ताब्यात मिळालेला नाही. दिल्लीच्या राव आयएएस स्टडी सेंटरमध्ये त्यांची भाची श्रेया यादव आयएएसची तयारी करीत होती. दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगरमध्ये एका इमारतीच्या तळमजल्यावर हे कोचिंग सेंटर आहे. स्टडीसेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने दोन विद्यार्थीनींचा आणि विद्यार्थ्यांना मृत्यू झाला आहे. मृतांत युपीतील आंबेडकर नगरात राहणारी श्रेया यादव हीचा देखील समावेश आहे. ही बातमी टीव्हीवर पाहून त्यांच्यावर आभाळच कोसळलं. श्रेयाला भावी आयएएस होणारच या त्यांच्या आशेवर पावसाच्या पाण्याने आणि प्रशासकीय हलगर्जीपणाचा बुलडोझर फिरला आहे. तिच्या गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने बरसावा हाशिमपूर गावात मातम पसरला आहे.

ती बातमी खरी ठरली…

तिचं शव मिळालेले नसल्याने काका धर्मेंद्र यादव यांना ही बातमी खोटी ठरावी ही आशा होती. परंतू जेव्हा मृतांची यादी त्यांच्या हाती लागली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आम्ही मोठ्या आशेने श्रेया हिला दिल्लीला पाठविले होते.ती नक्की आयएएस होणारच अशी आम्हाला आशा होती. कारण ती खूप हुशार होती असे अश्रू ढाळत धर्मेंद्र यादव सांगत होते. आता क्लासेस सेंटरवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. एनडीआरएफने अनेक मुलांना वाचविले परंतू तीन होतकरु विद्यार्थ्यांचा सिस्टीमने बळी घेतलाच असे धर्मेंद्र यादव म्हणाले…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.