CJP Saurav Das : ताब्यात घेतलं, तर तुम्ही लगेच तुमच्या..सीजेपी प्रवक्ते सौरव दास यांचं पोस्ट करुन आवाहन
CJP Saurav Das : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके त्यांचे दोन सहकारी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आज दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. अभिजीत दीपके आणि त्यांचे सहकारी आशुतोष रांका, सौरव दास हे दिल्लीकडे निघाले होते. जंतर-मंतरवर जाऊन ते आंदोलन करणार होते. मात्र, त्याआधी दिल्ली पोलिसांनी विमानातूनच दीपके आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं. असं घडू शकतं याची सीजेपीच्या नेत्यांना कल्पना होती. म्हणून कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. “तु्म्हाला ताब्यात घेतलं, तर लगेच तुमच्या रणनितीचा पूनर्विचार करा. तुमच्या अपयशासाठी दुसऱ्यांना जबाबदार धरु नका” अशी सौरव दास यांची भूमिका आहे. त्यांनी एक्सवर ही पोस्ट केली आहे.
आज सकाळी जंतर-मंतरवर आंदोलनासाठी काहीजण पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यावर सौरव दास यांनी ‘वादळ येतय’ अशी पोस्ट केली. काही महिन्यांपूर्वी दिल्लीत सीजेपीचं आंदोलन झालं होतं. नीट पेपर लीक प्रकरणात हे आंदोलन झालेलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी आंदोलकांची मागणी होती. त्यावेळी देशाच्या संसदेवर हे आंदोलक धडकले होते. मोठ्या प्रमाणात हिंसाचार झालेला. पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावेळी समाजातील सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटलेल्या.
असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झालेला
त्या आंदोलनाला सरकारच्या प्रतिमेला धक्का बसला होता. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे त्या आंदोलनाचं मोठं यश होतं.सीजेपीचं आंदोलन इतकं मोठं कसं झालं? असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झालेला. त्यामुळे आता हे आंदोलन मोठं होऊ नये याची सरकारने आधीच काळजी घेतली आहे. दिल्ली मेट्रो सेवा बंद आहे, अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत. दिल्लीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. खबरदारी म्हणून अभिजीत दीपके आणि त्यांचे सहकारी जंतर-मंतरवर पोहोचण्याआधीच त्यांना ताब्यात घेण्यात आलय.
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. तुषार गांधी यांना सध्या अंधेरीच्या डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये ठेवले आहे. जंतर मंतर येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तुषांर गांधी यांच्या हम भारत के लोग संघटनेचे लोक दुपारी ३.३० वाजता ॲागस्ट क्रांती मैदानात जमणार होते. त्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले.
