AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इस्त्रायलनंतर आता थेट ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन, जागतिक राजकारणात वेगवान घडामोडी, भारत ठरणार गेमचेंजर?

मोठी बातमी समोर येत आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली. यावेळी ट्रम्प यांनी मध्य पूर्वेतील स्थितीबाबत मोदी यांना माहिती दिली.

मोठी बातमी! इस्त्रायलनंतर आता थेट ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन, जागतिक राजकारणात वेगवान घडामोडी, भारत ठरणार गेमचेंजर?
pm modi, trumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 14, 2026 | 9:33 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, काही तासांपूर्वीच इस्त्रायच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी भारताला स्ट्रीट ऑफ होर्मूजमध्ये सध्या निर्माण झालेली स्थिती, लेबनॉनवरील कारवाई आणि मध्य पूर्वेमधील तणावाची स्थिती याबद्दल माहिती दिली, इस्त्रायलच्या फोननंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आहे. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने मध्यस्थी केली होती. त्यानंतर पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामासंदर्भात वाटाघाटी करण्यासाठी चर्चा झाली, मात्र ही चर्चा अयशस्वी ठरली. या चर्चेनंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून ही पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधील चर्चेची दुसरी वेळ आहे.

याबाबत अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली. या फोन दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी यांना मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावाबाबत माहिती दिली आहे. पुढे बोलताना अमेरिकेच्या राजदूताने असं देखील म्हटलं आहे की, अमेरिका आणि भारतादरम्यान काही महत्त्वाचे करार अपेक्षित आहेत, ज्यामध्ये ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कराराचा देखील समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प हे मोदींना सातत्याने अपडेट देत असतात.

या वर्षी तीन वेळा फोन

दरम्यान चालू वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये तीनदा फोनद्वारे चर्चा झाली आहे . दोन फेब्रुवारी रोजी चर्चा झाली होती, तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये अमेरिका आणि भारतामध्ये होणाऱ्या कराराबाबत महत्त्वाची चर्चा झाली . त्यानंतर 24 मार्च रोजी देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती, यामध्ये पश्चिम आशियामध्ये वाढत असलेल्या तणावाबाबत चर्चा झाली, दरम्यान त्यानंतर आज तिसऱ्यांदा ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. यावेळी ट्रम्प यांनी मोदींना मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या स्थितीबाबत माहिती दिल्याची बातमी समोर येत आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?