Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहंची महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्र्यांना म्हणाले, सर्वांनी….
Operation Sindoor : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी रात्री राष्ट्राला संबोधित करताना अत्यंत कठोर विधान केलं. भारताला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल अशी धमकी त्यांनी दिली. “काल रात्री केलेल्या चुकीची भारताला मोठी किंमत मोजावी लागेल”, असं शाहबाज म्हणाले.

पाकिस्तानसोबत दर तासाला तणाव वाढत असताना संभाव्य परिस्थितीचा सामना करण्याची तयारी सुरु झाली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर भारतातील पाकिस्तानी सीमेला लागून असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत अमित शाह यांनी आवश्यक सामानाचा साठा करुन ठेवण्याच आवाहन केलं. गृहमंत्री शाह यांनी स्वत: X हँडलवर माहिती दिलीय. आज पाकिस्तान आणि नेपाळ सीमेला लागून असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपराज्यपालांसोबत बैठक झाली. या बैठकीत राज्यांना सांगण्यात आलय की, आवश्यक सामान आणि सेवा उपलब्ध ठेवा. सोबतच कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी मदत आणि बचाव कार्यासाठी SDRF, सिविल डिफेंस, होम गार्ड्स आणि NCC ला अलर्टवर ठेवायला सांगितलं आहे.
सर्व मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देशविरोधी प्रचारावर लक्ष ठेवायला सांगितलं आहे. तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच संवेदनशील ठिकाणी सुरक्षा आणि संचार व्यवस्था मजबूत ठेवायला सांगितली आहे. 7 मे च्या मध्यरात्री भारताने पाकिस्तान आणि POK मध्ये एअर स्ट्राइक केला. ही कारवाई पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला होती. भारताने एकूण 9 ठिकाणी हल्ला केला. यात मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच हेडक्वॉर्टर सुद्धा उडवून दिलं.
In the meeting with the Chief Ministers and Lieutenant Governors of border states adjoining Pakistan and Nepal held today, asked the states to maintain the availability of essential goods and services and to keep relief and rescue forces like the SDRF, Civil Defence, Home Guards,… pic.twitter.com/oxbZgZOJMa
— Amit Shah (@AmitShah) May 7, 2025
पाकिस्तानची अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येतेय
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानची अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी रात्री राष्ट्राला संबोधित करताना अत्यंत कठोर विधान केलं. भारताला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल अशी धमकी त्यांनी दिली. “काल रात्री केलेल्या चुकीची भारताला मोठी किंमत मोजावी लागेल”, असं शाहबाज म्हणाले. आपल्या भाषणात देशवासियांना उद्देशून पंतप्रधान म्हणाले, “आपण आपल्या देशाच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. पाकिस्ताने भारताला काही तासांतच उत्तर देऊन मागे ढकललं आहे”, असाही दावा शरीफ यांनी केला.
