AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terrorist Attack : पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर किती मुस्लिम देश भारतासोबत? पूर्ण लिस्ट पाहा

Pahalgam Terrorist Attack : पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जगातील अनेक प्रमुख देश भारतासोबत उभे राहिले आहेत. हा पाकिस्तानसाठी एक झटका आहे. मुस्लिम जगातील आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेले हे देश आज भारताच्या पाठिशी आहेत. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक प्रकारे यश आहे.

Pahalgam Terrorist Attack : पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर किती मुस्लिम देश भारतासोबत? पूर्ण लिस्ट पाहा
Pahalgam Terrorist AttackImage Credit source: social media
| Updated on: Apr 25, 2025 | 9:46 AM
Share

काश्मीरच्या पेहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज जगातील अनेक देश भारतासोबत उभे आहेत. यात अनेक मुस्लिम देश सुद्धा आहेत, कतर, जॉर्डन आणि इराक हे त्यात प्रमुख देश आहेत, ज्यांनी स्टेटमेंट जारी करुन पेहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. भारत आणि पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करताना एकजुटतेचा संदेश दिला आहे. या देशांशिवाय अरब लीगच्या नवी दिल्ली स्थित मिशनने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून घटनेचा निषेध केला आहे. मंगळवारी पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झाले.

पेहेलगाम हल्ल्याचा या मुस्लिम देशांनी केला निषेध

सौदी अरेबिया

इराण

कतर

जॉर्डन

इराक

अफगाणिस्तान

ताजिकिस्तान

अरब लीग

मुस्लिम वर्ल्ड लीग (MWL)

कतरने काय म्हटलय?

कतरच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी एक स्टेटमेंट जारी केलं. कतर सरकार जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करते, असं त्यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात अनेक निर्दोष लोक मारले गेले. काहीही कारण असलं, तरी हिंसाचार, दहशतवाद आणि गुन्हेगारी कृत्यांविरोधात आमची कठोर भूमिका कायम आहे. भारत सरकार, भारतीय जनता आणि पीडित कुटुंबांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केली आहे. जखमींच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना करण्यात आली आहे.

इराक

इराकच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. आपण भारतासोबत असल्याच त्यांनी सांगितलं. पेहेलगाम क्षेत्रात झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचा इराक सरकार निषेध करते. अनेक निरपराध लोकांचा यामध्ये बळी गेला. शेकडो लोक प्रभावित झाले. आम्ही दहशतवादाच्या कुठल्याही प्रकाराविरोधात आहोत. इराकने भारत सरकार, जनता आणि पीडित परिवारांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे.

जॉर्डन

जॉर्डनच परराष्ट्र मंत्रालय आणि प्रवासी विषयाच्या विभागाने जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाममध्ये सर्वसामान्य नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. या दु:खद घटनेनंतर आम्ही भारतासोबत आहोत, त्यांना आमचं पूर्ण समर्थन आहे असं जॉर्डनने म्हटलं आहे. जॉर्डन सर्व प्रकारची हिंसा आणि दहशतवादाचा विरोध करतो.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.