निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, घोटाळे आणि धोरण ठरविण्याचा लकव्याने…

निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यानुसार देशात सात टप्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, घोटाळे आणि धोरण ठरविण्याचा लकव्याने...
PM NARENDRA MODI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Mar 16, 2024 | 5:42 PM

नवी दिल्ली | 16 मार्च 2024 : निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यानुसार देशात सात टप्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप, एनडीए निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. सुशासन आणि सार्वजनिक सेवेच्या आमच्या ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे आम्ही लोकांमध्ये जाऊ. सलग तिसऱ्यांदा मतदारांचे प्रेम आणि आशीर्वाद आपल्याला मिळतील असा मला पूर्ण विश्वास आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. देशात 19 एप्रिलला पहिले मतदान होणार आहे. तर, मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप-एनडीए निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे असे त्यांच्या X हँडलवर ट्विटर लिहिले आहे.

लोकशाहीचा सर्वात मोठा सण सुरू झाला आहे. भाजप एनडीए या निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहेत. सुशासन आणि सार्वजनिक सेवेच्या आमच्या ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे आम्ही लोकांमध्ये जाऊ. सलग तिसऱ्यांदा मतदारांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळतील, असा मला विश्वास आहे, असे मोदी यांनी पुढे म्हटले आहे.

चुकीच्या कारभारामुळे देश आणि जनता त्रस्त होती

दहा वर्षांपूर्वी आम्ही देशाची सूत्रे हाती घेतली. तेव्हा, भारत आघाडीच्या चुकीच्या कारभाराचा फटका देशाला आणि जनतेला बसला होता. घोटाळे आणि धोरण ठरविण्याचा लकव्याने कोणतेही क्षेत्र अस्पर्शित राहिले नव्हते. देश निराशेच्या गर्तेत गेला होता. जगानेही भारतावर विश्वास ठेवणे सोडले होते. त्या परिस्थितीतून आम्ही देशाला बाहेर काढले, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

140 कोटी भारतीयांच्या शक्तीने आपले राष्ट्र विकासाचे नवे विक्रम रचत आहे. आपण पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत. करोडो लोकांची गरिबीतून मुक्तता झाली आहे. आमच्या योजना भारताच्या सर्व भागांमध्ये पोहोचल्या आहेत आणि संपृक्ततेच्या जोरामुळे चांगले परिणाम मिळाले आहेत, असेही मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, चार राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणाही निवडणूक आयोगाने केली आहे. सिक्कीम राज्यातील 32 जागांसाठी, ओडीसा राज्यातील 47 जागांसाठी, अरुणाचल प्रदेश राज्यातील 60 जागांसाठी आणि आंध्रप्रदेश राज्यातील 175 जागांसाठी या निवडणुका होणार आहे.