
भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये, यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा एक भाग म्हणून त्यांनी भारतीय वस्तूंवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे. मात्र यांनंतर देखील भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवलेली आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारताला आणखी एक धक्का दिला आहे. भारतातील अमेरिकी दूतावासाकडून गुरुवारी मोठी घोषणा करण्यात आली आहे. काही भारतीय व्यावसायिक अधिकारी आणि कॉर्पोरेट नेत्यांचे व्हिसा रद्द करण्यात आल्याची माहिती अमेरिकन दूतावासाकडून देण्यात आली आहे.
या मागचं कारण सांगताना असा दावा करण्यात आला आहे की, ज्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत, त्यांचा अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये कथितरित्या सहभाग होता, दरम्यान यापूर्वी अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. त्यानंतर आता अमेरिकेनं हा मोठा निर्णय घेतला आहे. हा भारतासाठी अमेरिकेचा आणखी एक मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तास आधीच जे देश मोठ्या प्रमाणात अंमली पादार्थ तस्करी सारख्या गोष्टींशी जोडले गेले आहेत, त्यांना इशारा दिला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी या 23 देशांच्या यादीमध्ये भारताचा देखील समावेश असल्याचं म्हटलं आहे. आम्ही या सर्व देशांच्या हालचालींवर नजर ठेवून आहोत असं देखील त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर काही वेळातच ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे, ट्रम्प यांनी भारतातील काही व्यावसायिक अधिकारी आणि कॉर्पोरेट नेत्यांचे व्हिसा रद्द केले आहेत.
Stopping the flow of fentanyl and its precursors into the United States is one of our highest priorities. We have revoked visas for company executives and family for the unlawful involvement in controlled substance trafficking, including fentanyl. Those who facilitate the flow of… pic.twitter.com/atWupz7WLG
— U.S. Embassy India (@USAndIndia) September 18, 2025
याबाबत बोलताना अमेरिकन दूतावासानं म्हटलं आहे की जे लोक अवैध औषधांच्या तस्करीसाठी मदत करतात अशा लोकांना आता इथून पुढे आमच्या देशात प्रवेश मिळणार नाही. एवढंच नाही तर या लोकांच्या कुटुंबातील व्यक्तींना देखील आमच्या देशात आम्ही प्रवेश देणार नाहीत, अंमली पदार्थांपासून देशाचं संरक्षण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं अमेरिकन दूतावासानं म्हटलं आहे.