AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmedabad Bombblast : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा 13 वर्षांनंतर निकाल; 49 दोषी, 28 जणांची निर्दोष सुटका

अहमदाबादच्या 20 ठिकाणांवर 21 बॉम्बस्फोट केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल झाले होते. यातील 28 आरोपी 7 राज्यांतील वेगवेगळ्या तुरुंगात कैद आहेत. काही कैद्यांना नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

Ahmedabad Bombblast : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा 13 वर्षांनंतर निकाल; 49 दोषी, 28 जणांची निर्दोष सुटका
प्रेमविवाह केला म्हणून मुलीचा वडिलांच्या संपत्तीवरचा हक्क संपत नाहीImage Credit source: टीव्ही9
| Updated on: Feb 08, 2022 | 11:11 PM
Share

अहमदाबाद : गुजरातसह संपूर्ण देश हादरवून सोडणार्‍या 2008 मधील अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट (Ahmedabad Bomb Blast) प्रकरणाचा 13 वर्षांनंतर निकाल लागला आहे. गुजरातमधील विशेष सत्र न्यायालया(Gujrat Session Court)ने मंगळवारी हा निकाल जाहीर केला. या प्रकरणातील 77 आरोपींपैकी 49 जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे, तर 28 जणांची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. न्यायालय दोषींच्या शिक्षेचा निर्णय बुधवारी सुनावणार आहे. न्यायालय त्यांना नेमकी कोणती शिक्षा सुनावतेय, याकडे गुजरातसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या साखळी बॉम्बस्फोटांचा कट इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने घडवून आणला होता. पोलिस चौकशीत या दहशतवादी संघटनेचा कट उघडकीस आला होता. या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अखेर तो निकाल विशेष न्यायाधीश अंबालाल पटेल यांनी जाहीर केला आहे. (Ahmedabad chain bombing case after 13 years, 49 convicted, 28 acquitted)

या खटल्यात जवळपास 1117 साक्षीदार तपासण्यात आले

‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार डिसेंबर 2009 मध्ये सुरू होऊन दिर्घकाळ लांबलेल्या या खटल्यात जवळपास 1117 साक्षीदार तपासण्यात आले. विशेष न्यायालय 1 फेब्रुवारीला या खटल्याचा निकाल जाहीर करणार होते. तथापि, याचदरम्यान न्यायाधीशांना कोरोना संसर्ग झाला. त्यामुळे निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. अखेर मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला. या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 9 हजार पानी आरोपपत्र दाखल केले होते. त्यात 6 हजार पानी पुरावे होते. या पुराव्यांच्या आधारे आरोपींचे दोषत्व सिद्ध झाले आहे. सर्व ठोस पुराव्यांची गंभीर दखल घेत विशेष न्यायाधीशांनी मंगळवारी निकाल दिला.

अहमदाबादच्या 20 ठिकाणांवर 21 बॉम्बस्फोट केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल झाले होते. यातील 28 आरोपी 7 राज्यांतील वेगवेगळ्या तुरुंगात कैद आहेत. काही कैद्यांना नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

21 स्फोटांत 56 निष्पाप लोकांचा बळी गेला

गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या गोध्रा दंगलीचा बदला घेत दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनने 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट केले होते. 70 मिनिटांमध्ये एकापाठोपाठ एक केलेल्या 21 स्फोटांत 56 निष्पाप लोकांचा बळी गेला होता, तर 246 लोक गंभीर जखमी झाले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार, इंडियन मुजाहिद्दीन आणि स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाशी संबंधित दहशतवाद्यांनी हे साखळी बॉम्बस्फोट घडवले होते. त्यातील मोठ्या मनुष्यहानीमुळे संपूर्ण देशभरात दहशत निर्माण झाली होती. (Ahmedabad chain bombing case after 13 years, 49 convicted, 28 acquitted)

इतर बातम्या

Aditya Pancholi : आदित्य पांचोलीकडून चित्रपट निर्मात्याला मारहाण, जुहू पोलिसात परस्परांविरोधात तक्रार दाखल

Mumbai Crime : मालाडमध्ये बोगस डॉक्टरला अटक, मयत डॉक्टरच्या नावाने चालवत होता क्लिनिक

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...