AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टेरेसवर जायचीही सोय नाही ! पाय मोकळे करायला गेली अन् नको ते घडलं..

अहमदाबादमध्ये सुरक्षा रक्षकाकडून टेरेसवर तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. वायरने गळा दाबून आरोपीने अत्याचार केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. या घटनेमुळे महिला सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

टेरेसवर जायचीही सोय नाही ! पाय मोकळे करायला गेली अन् नको ते घडलं..
क्राईम न्यूज
| Updated on: Aug 10, 2026 | 1:45 PM
Share

फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील विविध राज्यांमध्ये महिलांवरील, तरूणींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना समोर येत असून, त्या वाचूनच संताप संताप होतो. . महिलांच्या सुरक्षेबद्दल विविध प्रश्न उपस्थित होत असतानाच आता गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक असा प्रकार घडलाय की जो वाचूनच डोक्यात अगदी तिडीक जाईल. तिथे एका इमारतीच्या संरक्षणासाठी ठेवण्यात आलेल्या वॉचमननेच नको ते कृत्य केलं. त्या इमारतीच्या टेरेवर फेरी मारण्यासाठी गेलेल्या तरूणीवर, इमारतीच्या वॉचमनने अत्याचार केले. ती ओरडू नये, प्रतिकार करू नये म्हणून त्याने वायरने गळा दाबून ठेवला आणि दुष्कृत्य केलं. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या आनंदनगर येथील सोसायटीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. अत्याचारानंतर तरूणीचा फोन लंपास करून तो सुरक्षारक्षक फरार झाला. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून पोलिसांनी आरोपी धरम सिंग ( वय 27) याला बेड्या ठोकत अटक केली. पीडित तरूणी ही इंटिरिअर डिझायनिंगचं शिक्षण घेत असून, तिला सध्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोपीने वायरने गळा दाबल्यामुळे तिच्या गळ्यालाही गंभीर जखम झाल्याचे समजते.

सोसायटीच्या टेरेसवर फिरायला गेली आणि नको तेच घडलं…

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ही भयानक घटना घडली. आनंदनगरच्या सोसायटीमध्ये एक पीजी हॉस्टेल असून पीडित तरूणी गेल्या वर्षभरापासून तिथे रहात आहे. फेरी मारायाला, पाय मोकळे करायला ती ती बऱ्याचदा सोसायटीच्या गच्चीवर जायची. शनिवारी रात्रीदेखील ती टेरेसवर गेली, मात्र तेव्हा सोसायटीचा सुरक्षारक्षक देखील तिथे पोहोचला. ती तरूणी एकटीच असल्याचं त्याने हेरलं. तीच संधि त्याने साधली आणि तरूणाीवर अत्याचार केले. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केल्यावर,हातपाय झाले. मात्र ते पाहूनन आरोपी गार्डने जवळच पडलेल्या वायरने पीडितेचै गळा दाबला, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि ओरडूनही शकली नाही. अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

अखेर रविवारी सकाळी अटक

या गुन्ह्यानंतर आरोपी तेथून पसार झाला. त्या तरूणीने कशीबशी हिंमत गोळा करत इमारतीतील लोकांना हाक मारली, त्यांनी मदतीसाठी धाव घेतली आणि पीडितेला रुग्णालयात दाखल केलं.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव धर्मसिंह असून तो उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील रहिवासी आहे. अहमदाबादमध्ये त्याने यापूर्वी अनेक कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम केले आहे. या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मसिंह छतावर पोहोचल्यानंतर त्याने जिन्याचा दरवाजा बंद केला होता. त्यामुळे पीडित विद्यार्थिनीला खाली पळून जाता आलं नाही. घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.

आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीसही हैराण

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सिक्युरिटी गार्डच्या हालचालींचा तपास करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची रेकॉर्डिंग तपासली. या फुटेजमध्ये जे काही दिसून आलं, ते पाहून पोलीसही हैराण झाले. लिफ्टमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी लिफ्टमध्ये येताना दिसत आहे. लिफ्टमध्ये प्रवेश करताच तो सर्वप्रथम समोरच्या आरशात आपला चेहरा पाहतो. त्यानंतर तो स्टाईल मारताना दिसतो आणि तब्बल १९ वेळा आपल्या केसांवरून हात फिरवत ते व्यवस्थित केले. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर चेहरा आणि मिशाही व्यवस्थित सेट करताना तो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यानंतर आरोपी लिफ्टमधून बाहेर पडला. लिफ्टसमोरच छतावर जाण्यासाठी असलेल्या जिन्यावरून तो वर गेला. त्यानंतर त्याने छतावर जाऊन कथितरित्या हा गुन्हा केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आरोपी हॉस्टेलच्या इमारतीतून बाहेर पडताना दिसला होता.

सहा दिवसांपूर्वीच नोकरीवर लागला होता आरोपी

पोलिस आणि स्थानिक क्राइम ब्रांचच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी आरोपीने आपला मोबाईल फोन बंद केला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज हा त्याच्याविरोधातील महत्त्वाचा पुरावा ठरला आणि त्याच्या मदतीने पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं. विशेष म्हणजे, आरोपी धर्मसिंह अवघ्या पाच-सहा दिवसांपूर्वीच या सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला लागला होता. त्याचे बॅकग्राउंड व्हेरिफिकेशनही करण्यात आलं नव्हतं, अशी धक्कादायक माहितीदेखील समोर आली आहे. अखेर रविवारी  सकाळी त्याला अहमदाबादमधूनच अटक करण्यात आली.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा