कोरोनामुळे AIIMS रुग्णालयाचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द

म्स रुग्णालयातील ओपीडी आणि कॅम्पस परिसरात सातत्याने आपातकालीन नियमांचे पालन केले जात आहे. | AIIMS

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:56 AM, 10 Dec 2020
कोरोनामुळे AIIMS रुग्णालयाचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द
जुलैच्या सत्रासाठी आयएनआय सीईटी तारखेची घोषणा

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘एम्स’कडून हिवाळ्याच्या काळात कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. 23 डिसेंबर ते 10 जानेवारी या काळात कर्मचाऱ्यांना या सुट्ट्या मिळणार होत्या. (AIIMS cancels employees winter vacation)

गेल्या काही महिन्यांपासून एम्स ट्रॉमा केअर सेंटर आणि एनसीआई झज्जर कोरोना रुग्णांना उपचार देण्यात आघाडीवर आहेत. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये 265 खाटा आहेत. तर एनसीआई झज्जर येथे जवळपास 1500 खाट आहेत. एम्स रुग्णालयातील ओपीडी आणि कॅम्पस परिसरात सातत्याने आपातकालीन नियमांचे पालन केले जात असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी.के. शर्मा यांनी दिली.

कोरोनामुळे एम्स रुग्णालयातील व्यवस्थेत बदल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या एम्स रुग्णालयात वैकल्पिक शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, ‘एम्स’च्या आपातकालीन विभागात दिवसाला 300 तर ओपीडीत दिवसाला 100 रुग्ण येत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालयात खाटाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. सामान्य ओपीडी किंवा इतर शस्त्रक्रिया सुरु होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. दिल्लीतील कोविडची परिस्थिती पाहून याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराबाबतची ‘ती’ बातमी खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी नाकारल्याची बातमी खोटी असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांना कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी नाकारली आहे, अशी बातमी काही माध्यमांनी दिली होती. ती पूर्णत: खोटी असल्याचे सांगत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आम्ही परवानगी नाकारली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

संबंधित बातमी :

Rajesh Tope | कोरोना लसीकरणाच्या नियोजनात महाराष्ट्र नंबर एकवर : राजेश टोपे

Corona Vaccine | केंद्राचा कोरोना लसीकरणाचा प्लॅन तयार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल समोर, कोणती लस जास्त प्रभावी?

(AIIMS cancels employees winter vacation)