धक्कादायक! पहलगाम हल्ल्यानंतर एम्सच्या डॉक्टरने वाटली मिठाई, म्हणाला रमजानची…
मोठी बातमी समोर येत आहे, पहलगाम हल्ल्यानंतर एम्सच्या एका डॉक्टरने मिठाई वाटल्याची घटना समोर आली आहे, या प्रकरणात त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. या घटनेनंतर एम्सच्या एका डॉक्टरने मिठाई वाटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी या डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. तंजीम अकरम असं या डॉक्टरचं नाव आहे, हा डॉक्टर ऋषिकेशचा रहिवासी आहे. तो आता चांगलाच अडचणीत आला आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या डॉक्टराने मिठाई वाटल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एवढंच नाही तर या डॉक्टरने यापूर्वी देखील हिंदू विरोधी पोस्ट केल्याचा आरोप हिंदूत्ववादी संघटनांकडून त्याच्यावर करण्यात आला आहे, या प्रकरणात हिंदूत्ववादी संघटनांकडून त्याच्याविरोधात एम्समध्ये दोनदा आंदोलन देखील करण्यात आलं होतं. त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती.
त्यानंतर आता पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने एम्समध्ये मिठाई वाटल्याचा आरोप या डॉक्टरवर करण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते राजेंद्र पांडेय यांनी पोलिसांना माहिती देताना सांगितलं की, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी पोलिसांनी पर्यटकांना धर्म विचारून गोळीबार केला. या घटनेनंतर तंजीम अकरम नावाच्या या डॉक्टरने एम्स परिसरात मिठाई वाटली. याबद्दल त्याच्याकडे विचारणा केली असता रमजानची मिठाई असल्याचं या डॉक्टरने सांगितलं. वास्तविक पाहाता पहलगामचा हल्ला झाला तेव्हा रमजानचा महिना संपल्याला अनेक दिवस झाले होते. या डॉक्टरने पहलगामचा हल्ला झाल्यानंतर मिठाई वाटली, दहशतवादाचं समर्थन केलं असा आरोप पांडेय यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्याच्यावर आता गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान यापूर्वी देखील त्याने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर हिंदूर विरोधी पोस्ट केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला होता, या प्रकरणात हिंदूत्ववादी संघटनांकडून आंदोलन देखील करण्यात आलं होतं.