AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दहशतवादी लखवी कारागृहात असताना बाप बनला…’, ओवैसी यांनी अल्जीरियामध्ये पाकिस्तानची केली पोलखोल

asaduddin owaisi: पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी केंद्र सरकारने शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर पाठवले आहे. या शिष्टमंडळातील सदस्य असलेले ओवैसी अल्जीरियात पोहचले. त्यांनी अल्जीरियातून पाकिस्तानची पोलखोल केली.

'दहशतवादी लखवी कारागृहात असताना बाप बनला...', ओवैसी यांनी अल्जीरियामध्ये पाकिस्तानची केली पोलखोल
asaduddin owaisi
| Updated on: Jun 01, 2025 | 8:43 AM
Share

Asaduddin Owaisi: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी अल्जीरिया दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी केंद्र सरकारचे शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर आहे. त्यातील एका शिष्टमंडळात ओवैसी यांचाही समावेश आहे. भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वात हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ उत्तर अफ्रिकेतील अल्जीरियात दाखल झाले आहे. या शिष्टमंडळाने पाकिस्तानची पोलखोल अल्जीरियात केली.

ओवैसी सर्वपक्षीय शिष्टमंडळात अल्जीरियात गेले आहे. त्यांनी अल्जीरियातून पाकिस्तानवर जोरदार हल्ला करत शाहबाज सरकारचा खरा चेहरा जगासमोर आणला. ओवैसी म्हणाले, इस्लामाबाद दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचे धोरण अवलंबत आला आहे. त्यामुळे दक्षिण आशियात अशांतता निर्माण झाली आहे. जकीउर रहमान लखवी नावाचा दहशतवादी पाकिस्तानात आहे. तो कारागृहात असताना बाप बनला आहे. जगभरात कुठेही दहशतवाद्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला कारागृहाच्या बाहेर जात येत नाही. परंतु लखवी कारागृहात असताना एका मुलाचा बाप बनला. त्यानंतर पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये जाण्याचा धोका निर्माण झाला. यामुळे लखवीवरील खटला पुढे सुरु झाला.

सांसद असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले, भारत आणि अल्जीरियाने नोव्हेंबर 2024 मध्ये एका करारावर सही केली होती. त्या करारानुसार दोन्ही देश पुढे जातील, अशी मला खात्री आहे. दोन्ही देशांचे संबंध अधिक मजबूत होतील. आमचे पंतप्रधान लवकरच अल्जीरियात येतील. तसेच अल्जीरियाचे राष्ट्रपतीही भारतात येतील, अशी मला अपेक्षा आहे. आमच्याकडे 2018 मधील अनुभव आहे. त्यावेळी अल्जीरियाने भारताला मदत केली होती.

सांसद ओवैसी यांनी सांगितले की, पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना धार्मिक मान्यता मिळाली आहे. परंतु इस्लाम कोणत्याही व्यक्तीला हत्या करण्याची परवानगी देत नाही. परंतु दुर्देवाने त्यांची विचारधारा वेगळी आहे. आता पाकिस्तानाला फायनेन्शियल एक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची वेळ आली आहे. त्यानंतर भारतातील दहशतवादी घटना कमी होतील. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर नियंत्रण करणे जागतिक शांततेसाठी आवश्यक आहे, असे ओवैसी यांनी म्हटले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.