AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air India Plane Crash : भारतातले 5 खतरनाक रन-वे, एक्सपर्ट पायलटसाठी सुद्धा इथे टेकऑफ आणि लँडिग चॅलेंजिग

Air India Plane Crash : अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला देशातील पाच खतरनाक हवाई धावपट्ट्यांची माहिती देणार आहोत, जिथे टेकऑफ आणि लँडिंग चॅलेंजिंग असतं.

Air India Plane Crash : भारतातले 5 खतरनाक रन-वे, एक्सपर्ट पायलटसाठी सुद्धा इथे टेकऑफ आणि लँडिग चॅलेंजिग
Portblair AirPortImage Credit source: Unsplash
| Updated on: Jun 12, 2025 | 4:03 PM
Share

भारतात आज एक भीषण विमान अपघात घडला. 242 प्रवासी या विमानात आहेत. अहमदाबादच्या मेघानी भागात ही विमान दुर्घटना घडली. एअर इंडियाच हे विमान उड्डाणानंतर काही मिनिटात कोसळलं. भारतात अनेक विमानतळं आहेत, जिथून दरवर्षी लाखो प्रवासी देश-विदेशात प्रवास करत असतात. अनेक विमानतळांवर कमर्शियल विमानांसाठी विशाल रन-वे आहेत. काही रनवे असे सुद्धा आहेत, जे कॉम्पॅक्ट म्हणजे छोटे आहेत. हे छोटे एअरपोर्ट दूरच्या दुर्गम भागांना जोडण्याच काम करतात. या छोट्या लँडिंग स्ट्रिप्स अनुभवी वैमानिकांसाठी सुद्धा आव्हानात्मक असतात. जाणून घेऊया भारतातल्या पाच छोट्या रनवेबद्दल.

बाल्जेक विमानतळ

मेघालय येथील बाल्जेक एअरपोर्टच्या रन-वे ची लांबी फक्त 3,300 फूट (1,006 मीटर) आहे. हा देशातील सर्वात लहान रनवे पैकी एक आहे. 2008 साली या विमानतळाच उद्घाटन झालं. डोर्नियर 228 सारख्या छोट्या विमानासाठी हा एअरपोर्ट बनवण्यात आला. डोर्नियर 228 मधून 20 प्रवासी प्रवास करु शकतात. हा विमानतळ आता चालू नाहीय.

कुल्लू-मनाली विमानतळ

हिमालयात असलेल्या या एअरपोर्टला भुंतर विमानतळ म्हणूनही ओळखलं जातं. इथे रन-वे ची लांबी 3,691 फीट (1,125 मीटर) आहे. या विमानतळावरुन टेकऑफ आणि लँडिंग पायलटसाठी चॅलेंजिग असते

सिमला विमानतळ

या विमानतळाला जुब्बडहट्टी एअरपोर्ट म्हणूनही ओळखलं जातं. हिमाचल प्रदेशात सिमलापासून जवळपास 22 किलोमीटरवर हा विमानतळ आहे. . 3,691 फूट (1,125 मीटर) रन-वे ची लांबी आहे. इथून टेक-ऑफ आणि लँडिंग पायलटसाठी आव्हानात्मक असते.

अगत्ती विमानतळ

लक्षद्वीप येथे असलेल्या अगत्ती बेटावरील अगत्ती विमानतळाच्या रन-वे ची लांबी 4,235 फूट (1,291 मीटर) आहे. लक्षद्वीपमधील हे एकमेव विमानतळ आहे. या विमानतळामुळे सुदूर क्षेत्र भारताच्या मुख्य भूमीला जोडलं जातं.

बालुरघाट विमानतळ

पश्चिम बंगालच्या बालुरघाट विमानतळाच्या रन-वे ची लांबी 4,905 फूट (1,495 मीटर) आहे. या विमानतळाचा आकर्षक इतिहास आहे. द्वितीय विश्व युद्धाशी संबंधित हा विमानतळ आहे. इंग्रजांनी हा विमानतळ वापरलेला. छोट्या धावपट्टीमुळे विमानच टेक-ऑफ आणि लँडिंग इथे चॅलेंजिग आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी