
Ahmedabad Plane Crash : वर्ष 2025 मध्ये शनिनंतर राहु, केतू आणि गुरूचे राशी परिवर्तन झाले. अनेक ज्योतिषांनी त्यांचे तर्क आणि गणित मांडले. तर कुंडली विश्लेषक आणि ज्योतिषी डॉ. अनीष व्यास यांनी 5 जून रोजी हे एक भविष्यवाणी केली होती. त्यानुसार, 7 जून रोजी मंगल सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तिथे केतू अगोदरच ठाण मांडून बसला आहे. दोन क्रूर ग्रहांची युती होते, त्यावेळी कुंजकेतू योग तयार होतो. मेदिनी ज्योतिषात राहु आणि केतूची राशी आणि नक्षत्रात गोचर केल्याने नकारात्मक घटनांचा क्रम सुरू होत असल्याचे मानण्यात येते. यामध्ये अग्निकांड, महामारी, मोठी दुर्घटना, विमान अपघात, राजकीय उलथापालथ, जातीवाद, धार्मिक कट्टरता याविषयीच्या घटना घडतात, असा दावा करण्यात येतो.
ANI ने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले. या विमानात 242 प्रवासी होते. ताज्या अपडेटनुसार, प्रवाशांना वाचवण्यासाठी या ठिकाणी NDRF ची टीम पोहचली आहे. तर BSF ची टीम सुद्धा घटनास्थळी पोहचली आहे. हे विमान दिल्लीहून अहमदाबाद येथे पोहचले होते. हे विमान लंडनसाठी रवाना झाले होते.
कुंजकेतू योग अशुभ
एबीपीच्या वृत्तानुसार, डॉक्टर अनीष व्यास यांनी कुंजकेतू योगविषयी ज्योतिषशास्त्राआधारे काही माहिती दिली आहे. त्यानुसार, 7 जून रोजी मंगळ हा सिंह राशीत दाखल झाला. तर तिथे केतू अगोदरच ठाण मांडून बसला आहे. या दोन ग्रहांची जेव्हा युती होते, तेव्हा ती अशुभ मानण्यात येते. मंगळ हा अग्नि तत्त्व तर केतू हा छाया देणारा ग्रह मानण्यात येतो. दोघांची युती ही विनाशकारी मानण्यात येते. सध्या भारताच्या कुंडलीत चौथ्या घरात मंगळ आणि केतू दाखल होतील. त्यामुळे एक नाही तर तीन तीन अग्नि तत्व यावेळी भारताच्या कुंडलीत आले आहेत. देशात अनेक चिंता वाढवणाऱ्या घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
1989 मध्ये काय घडले होते?
ऑगस्ट 1989 मध्ये जेव्हा मंगल आणि केतू सिंह राशीत दाखल झाले होते. त्यावेळी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांनी त्यावेळी भारताच्या केंद्रीय राजकारणात मोठा भूकंप घडवला होता. या काळातील अनेक घटनांनी देशाचा इतिहासच बदलून टाकला. देशाच्या राजकारणाला मोठी कलाटणी दिली. 1990 मध्ये काश्मीर पंडितांच्या विस्थापनाला हाच काळ कारणीभूत ठरला.
7 जून ते 28 जूलै 2025 या दरम्यान मंगळ आणि केतू हे ग्रह सिंह राशीत असतील. यावेळी हा कालावधी 51 दिवसांचा आहे. या काळात ज्या घटना घडतील, त्या सर्वांचे लक्ष वेधतील. याकाळातील अनेक घटना इतिहासाच्या पानावर नोंद होतील. नैसर्गिक संकटं तर मानवीय चुकांमुळे मोठ्या घटना होतील असे संकेत देण्यात येत आहेत.