दिल्लीनंतर मुंबईतही जीवघेणं प्रदूषण, मुंबईकरांचं आयुष्य नेमकं किती वर्षांनी घटणार? नव्या सर्व्हेत खुलासा

दिल्लीनंतर मुंबईतही जीवघेणं प्रदूषण, मुंबईकरांचं आयुष्य नेमकं किती वर्षांनी घटणार? नव्या सर्व्हेत खुलासा
Air pollution

मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात 48 कोटींहून अधिक लोक गंभीर पातळीच्या वायू प्रदूषणात राहत आहेत, जे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. अहवालात विशेषत: महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील परिस्थिती बद्दल सांगितली आहे की या भागांमध्ये सरासरी व्यक्ती 2.5 ते 2.9 वर्षे आयुष्य गमावत आहे. हा परिणाम दीर्घकाळ वायू प्रदूषणात राहिल्यानंतर दिसून येतो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Devashri Bhujbal

Nov 26, 2021 | 4:49 PM

नवी दिल्लीः भारतातील वायू प्रदूषण इतक्या गंभीर पातळीवर आहे की वायुप्रदूषणामुळे भारतीयांचे सरासरी आयुष्यातील 9.7 वर्षा कमी होत आहे, ज्यामध्ये दिल्ली, मुंबई आणि कोलकाता सारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे. एका सर्वेक्षणानुसार, देशातील 40 टक्के लोकसंख्या -विशेषत: उत्तर भारतातील लोक, नऊ वर्षांपेक्षा जास्त आयुष्य गमावतील जर प्रदूषण पातळी अशीच कायम राहिली. हे आकडे 2019 मध्ये नोंदवलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकानुसार (air quality index) आहेत. गेल्या दोन वर्षांत भारतातील हवेची गुणवत्ता सुधारण्याऐवजी अजूनच खराब झाली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो (EPIC) च्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स (AQLI) मधील निष्कर्षांनुसार हे आकडे आहेत.

सर्वेक्षणानुसार, मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात 48 कोटींहून अधिक लोक गंभीर पातळीच्या वायू प्रदूषणात राहत आहेत, जे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. अहवालात विशेषत: महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील परिस्थिती बद्दल सांगितली आहे की या भागांमध्ये सरासरी व्यक्ती 2.5 ते 2.9 वर्षे आयुष्य गमावत आहे. हा परिणाम दीर्घकाळ वायू प्रदूषणात राहिल्यानंतर दिसून येतो.

उत्तर भारतात सध्या परिस्थिती इतकी वाईट आहे की सरकारला शाळा बंद कराव्या लागल्या आणि लोकांना घरून काम करण्यास सांण्यात आले. दिल्ली आणि एनसीआरमधील वायू प्रदूषण पातळी पाहून सर्वोच्च न्यायालयाने ही लॉकडाऊन सारखी परिस्थिती असल्याचेही म्हटले. उत्तर भारतात वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक पावले उचलली गेली असली तरी त्यात यश मिळत नाहीये. आणि परिस्थिती दरवर्षी वाईट होत आहे.

WHO चे निरीक्षणं काय आहेत?

भारतातील वायू प्रदूषणाची उच्च पातळी कालांतराने भौगोलिकदृष्ट्या वाढत गेली आहे. काही दशकांपूर्वीच्या तुलनेत, भारतातील वायू किंवा जल प्रदूषण आता देशाच्या काही विशिष्ट भागांपुरते मर्यादित रोहिलेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक तत्त्वानुसार वायू प्रदूषणातील हानिकारक कण कमी न केल्यास, सरासरी व्यक्तीचे आयुष्य किमान  2.2 वर्षे कमी होईल. जगातील सर्वाधिक प्रदूषित भागात राहणाऱ्या लोकांचे आयुष्य किमान 5 वर्षेानी कमी झाल्याचे आढळले आहे. WHO नुसार दक्षिण आशियामध्ये लोकांचे एकूण 58 टक्के आयुष्य कमी झाले आहे. ही टक्केवारी या भागात उच्च प्रदूषणासह आणि जास्त लोकसंख्याेमुळे अधिक आहे.

इतर बातम्या –

26/11: धावत्या मुंबईला थांबायला लावणारा हल्ला! असंख्य जखमा, रक्तपात अन् दहशतवादाशी दोन-हात!

ED Raid: शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई!


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें