एकत्र पळालेल्या सासू-जावयाचं काय होणार? राहुल-अपना देवींबद्दल पोलिसांचा मोठा निर्णय

तरूणीशी लग्न ठरलेलं असतानाच तिच्या आईसोबत पळून गेलेल्या जावई-सासूबाईंची जोडी सध्या प्रचंड चर्चेत आहेत. घरच्यांनी यासंबंधी पोलिसांत तक्रार दिली, शोधाशोधही झाली, त्यानंतर काही दिवसांनी सासू आणि जावई हे स्वत:च पोलिसांसमोर शरण आले. ते ऐकताच घरचेही तिथे पोहोचले, कुटुंबियांनी मुलीची आई अपना देवीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या जावयासोबतच राहण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. अखेर या दोघांबद्दल अलिगड पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. सासू-जावयाच्या या अनोख्या जोडीचं नक्की काय होणार ?

एकत्र पळालेल्या सासू-जावयाचं काय होणार? राहुल-अपना देवींबद्दल पोलिसांचा मोठा निर्णय
राहुल-अपना देवींचं काय होणार ?
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Apr 19, 2025 | 8:34 AM

उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील बहुचर्चित सासू आणि जावई प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं असून सध्या पोलिसांनी सासू आणि जावयाची सुटका केली आहे. दोघेही आता एकत्र राहतील. राहुल आणि अपना देवी या दोघांचेही 2 दिवस समुपदेशन करण्यात आले. पण आम्ही आता एकत्र राहू असंच दोघांचं म्हणणं आहे. सासूनेही नवऱ्याकडे परत जाण्यास नकार दिलाय. तर राहुलच्या वडिलांनीही त्याला घरातून बाहेर काढले आहे. पोलिसांकडून सुटका झाल्यावर सध्या ते दोघे कुठेत, याचा ठावठिकाणा लागलेा नाही.

मात्र पोलिस ठाण्यातून बाहेर पडताच मीडियाने राहुल आणि अपना देवींसमोर प्रश्नांचा भडिमार केला. राहुलला विचारले की आता तू त्यांच्यासोब कसा राहणार? तुम्ही कोर्ट मॅरेज केले होते का की कोर्टाची परवानगी घेतली होती? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले पण राहुलने कोणत्याी प्रश्नाचे धड उत्तर दिलं नाही. तो आधी म्हणाला की आम्ही आधीच विवाहीत आहोत. लग्न कसं केलं विचारल्यावर राहुल म्हणाला- आम्ही कोर्ट मॅरेज केलं. पण घटस्फोट मिळाल्याशिवाय कोर्टाने लग्नाला परवानगी कशी दिली ? असा प्रश्न विचारल्यावर मात्र राहुलने त्यावर काहीही बोलण्यास नकार दिला.

तर मीडियाने जेव्हा अपना देवींना प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा त्या खूप रागावल्या. तुमचा मोबाईल तोडून टाकेन, अशी धमकीही त्यांनी दिल्याचे समजते. मला काहीच बोलायचं नाही असं म्हणत त्या तिथून निघून गेल्या. अपना देवी यांनी आधीच सांगितले आहे की त्या राहुलला पती मानतात. आधीच्या पतीकडे, जितेंद्र कडे परत जाणार नसल्याचं त्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. माझा आधीचा पती मला मारहाण करायचा, असा आरोप त्यांनी केला होता. तसेच पतीने लावलेला चोरीचा आरोपही चुकीचा असल्याचा दावाही अपना देवींनी केलाय. मी घरातून कॅश किंवा दागिने घेऊन पळाले नाही, फक्त 200 रुपये घेऊन गेले, असा दावा त्यांनी केला.

आम्ही कायदेशीर प्रक्रियेनुसार दोघांचीही चौकशी केली. समुपदेशनही करण्यात आले. दोघांनाही एकत्र राहायचे आहे. त्यांना आता सोडण्यात आले आहे, असे याप्रकरणी इग्लास पोलिस स्टेशनचे सीओ महेश कुमार यांनी सांगितलं.

बायकोला घटस्फोट देणार नाही

तर दुसरीकडे, अपना देवींचा आधीचा पती जितेंद्र यांनी तिला घटस्फोट देण्यास नकार दिला आहे. मुलं अजूनही लहान आहेत आणि त्यांना त्यांच्या आईची गरज आहे. मी एकटा त्यांना कसे सांभाळणार? असा सवाल त्यांनी केला. अपना देवी यांनी त्यांच्या पतीवर मारहाणीचा आरोप केला होता. घरखर्चाच्या नावाखाली तो फक्त 1500 रुपये देतो, ज्याचा तो संपूर्ण हिशेब ठेवतो. तसेच, ६-६ महिने कोणंतही काम करत नाही, असा आरोप अपना देवींनी केला होता. मात्र जितेंद्र यांनी हे सर्व आरोप चुकीचे असल्याचा दावा केला. मी तिला घरखर्चाचे पैसे द्यायचो, कधी हिशोबही मागितला नाही. बंगळुरूत माझा स्वतःचा बिझनेस आहे, दूध विकण्यातचेही काम करतो. त्यामुळे बेरोजगार असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा त्यांनी केला.

राहुलसोबत पळून जा

याशिवाय, अपना देवी यांनी आरोप केला होता की जितेंद्र आणि त्यांची मुलगी दोघेही तिचे नाव राहुलशी चुकीच्या पद्धतीने जोडत होते. जर ती कधी राहुलशी बोलली, तर जितेंद्र तिच्याशी भांडायचा. एवढेच नाही तर पतीने तिला राहुलसोबत पळून जाण्यास सांगितले, असा दावाही अपना देवी यांनी केला होता. मात्र जितेंद्रने हे सर्व आरोप फेटाळून लावले.