AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ज्याने त्याने ज्याचा त्याचा पक्ष वाढवावा, पण विकासासाठी एकत्र यावे”, मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही बाहेरचे लोक आमदार आहेत. त्यामुळे ज्याने त्याने ज्याचा त्याचा पक्ष वाढवावा, असे वक्तव्य पाणीपुरवाठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

ज्याने त्याने ज्याचा त्याचा पक्ष वाढवावा, पण विकासासाठी एकत्र यावे, मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन
Gulabrao-Patil
| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 12:30 AM
Share

जळगाव : “आज कोणीही मी एका पक्षाचा आहे असे सांगू शकत नाही. सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करून आमदार झाले आहेत. भाजपत तब्बल दोन डझन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बाहेरचे लोक आमदार आहेत. त्यामुळे ज्याने त्याने ज्याचा त्याचा पक्ष वाढवावा, असे वक्तव्य पाणीपुरवाठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले. तसेच ज्याने त्याने ज्याचा त्याचा पक्ष वाढवावा, मात्र विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. (all party can expand themselves but have to come together for development said Gulabrao Patil)

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या धान्यासाठी चाळण व प्रतवारी यंत्रणा उभारली आहे. या प्रकल्पाचे माजी खासदार तथा माजी आमदार हरिभाऊ जावळे असे नामकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना गुलाबराव पाटील यांनी वरील वक्तव्य केले.

विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे

यावेळी पुढे बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. तसेच पक्ष वाढवण्यासाठी ज्याने त्याने मजेल तसा प्रयत्न करावा. पण विकासासाठी सर्वांनी सोबत यावे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच सध्या सर्वच पक्षात बाहेरचे लोक घुसखोरी करुन आमदार झाले आहेत. आमच्यासारखे थोडेच लोक आहेत, जे एकाच पक्षाशी एकनिष्ठ आहेत, असेसुद्धा गुलाबराव पाटील म्हणाले.

माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्याविषयी गौरवोद्गार

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना त्यांनी माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. यावेळी बोलताना खासदार रक्षा खडसे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजू भोळे तसेच भाजप व शिवसेनेचे नेते उपस्थित होते.

इतर बातम्या :

पुण्यात गृहमंत्र्यांच्याच कार्यक्रमात कोरोना नियमांना हरताळ, कार्यकर्त्यांच्या तुफान गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

मेट्रोच्या डबलडेकर पुलावर स्फोटकांनी भरलेला ट्रक, मोठा घातपात घडवण्याचा डाव? नागपूर पोलिसांची धावपळ

लॉकडाऊन काळातही देशात दुचाकींची जोरदार विक्री, ‘या’ 5 गाड्यांना सर्वाधिक पसंती

(all party can expand themselves but have to come together for development said Gulabrao Patil)

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...