AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तापमानाचे सर्व रेकॉर्ड तुटणार, 19 व्या शतकातील सर्वात शक्तीशाली El Niño तयार होतंय..

साल २०२६ मध्ये जगाला एका आणखी मोठ्या उन्हाळ्याचा सामना करावा लागू शकतो. प्रशांत महासागरात तयार होत असलेले एल-निनो आणखीन मजबूत होऊ शकते असे हवामान विभागाने म्हटले आहे.

तापमानाचे सर्व रेकॉर्ड तुटणार, 19 व्या शतकातील सर्वात शक्तीशाली El Niño तयार होतंय..
Scorching Summer
| Updated on: Aug 22, 2026 | 9:50 PM
Share

यंदा पाऊस कमी पडणार असा इशारा आधीच हवामान विभागाने दिला होता. आता आणखी एक भीतीदायक भविष्य वर्तवण्यात आले आहे. या वर्षी जगाला आणखी एका तीव्र उन्हाळ्याचा सामना करावा लागणार आहे. हवामान शास्रज्ञांच्या मते प्रशांत महासागरात तयार होणारे एल -निनो यंदा खूप मजबूत होऊ शकते. इतके मजबूत १९ व्या शतकानंतरचे सर्वात मोठे ताकदवान एल-निनो बनू शकते. या जगाचा सरासरी तापमान आणखी वाढू शकते आणि २०२६ आणि २०२७ सर्वात उष्ण होऊ शकते.

अल निनो स्थितीत प्रशांत महासागराच्या पूर्व भागातील समुद्राचे पाणी सामान्य पातळीहून अधिक तापते. या वेळी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यहून सुमारे ३ डिग्री सेल्सियसहून जास्त होण्याचा अंदाज आहे. संशोधकांच्या मते सामान्य मजबूत एल – निनोत तापमान सुमारे १ ते २ डिग्री सेल्सियसपर्यंत वाढू शकते.

एल- निनो हे एक नैसर्गिक हवामानाचे चक्र आहे जे दर काही वर्षांनी घडत असते. जेव्हा समुद्राचे पाणी उष्ण होते, तेव्हा वातावरणात अधिक उष्णता सोडली जाते. यामुळे वाऱ्याचे प्रवाहाच्या दिशा आणि पावसाच्या पद्धतीत बदल होतात, ज्याचा परिणाम जगभरातील विविध देशांच्या हवामानावर होत असतो.

यंदा एल- निनो किती तीव्र?

तीव्र एल- निनोमध्ये, पूर्व पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान सामान्यपेक्षा १ ते २ अंश सेल्सिअसने जास्त असते. २ अंशांची वाढ देखील मोठी गंभीर आणि लक्षणीय मानली जाते. मात्र, यावेळी तापमानात सुमारे ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

भारताच्या मान्सूनवर परिणाम

एल-निनोने समुद्र आणि हवेचा सामान्य पॅटर्न बदलून जातो. त्याचा परिणाम प्रत्येक जागी एकसारखा नसतो. काही भागात जास्त पाऊस आणि पूर येऊ शकतो. तर काही जागी कमी पाऊस आणि जास्त उन्हाळा असू शकतो. भारताच्या मान्सूनवर देखील एल-निनोचा परिणाम होऊ शकतो. मजबूत एल-निनोला नेहमीच भारतीय मान्सूनशी जोडून पाहिले जाते. यामुळे यावेळी मान्सूनवर देखील नजर राखली जात आहे.

२०२६ वा २०२७ सर्वात उष्ण वर्षे

यंदा एल-निनोमुळे साल २०२६ सर्वात उष्ण वर्षे होऊ शकते. मात्र, साल २०२७ सर्वात उष्ण राहण्याची शक्यता आहे. यामुळे एल-निनोने समुद्राच्या पृष्ठभागचे तापमान उष्ण झाले होते. त्यामुळे पृथ्वीचे तापमान काही वेळानंतर जास्त दिसत आहे. १९९८ आणि २०१६ मध्ये मजबूत एल-निनो दरम्यान मजबूत एल-निनो दरम्यान तापमानाचे रेकॉर्ड बनले होते. परंतू आता क्लायमेंट चेंजमुळे पृथ्वीचे तापमान आधीपासून जास्त उष्ण झाले आहे. यामुळे अल-निनो तापमानला वर घेऊन जाऊ शकते.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!