अमेरिकेची दादागिरी संपली; भारताला मोठी लॉटरी, ब्रिक्स परिषद सुरू असतानाच इराणची सर्वात मोठी घोषणा
मोठी बातमी समोर येत आहे. आज ब्रिक्स परिषदेचा दुसरा दिवस आहे. तर दुसरीकडे इराणकडून सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे. भारतासाठी आनंदाची बातमी आहे. भारताला मोठी लॉटरी लागली आहे.

आज ब्रिक्स शिखर परिषदेचा दुसरा दिवस आहे. भारत ब्रिक्स शिखर परिषदेचं यजमान पद भुषवत आहे. ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासह इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान देखील सहभागी झाले आहेत. संपूर्ण जगाचं लक्ष या शिखर परिषदेकडे लागलेलं असतानाच आता दुसरीकडे भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज समोर आली आहे. भारताला मोठी लॉटरी लागली आहे. इराणकडून सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता अमेरिकेची दादागिरी संपुष्टात येणार आहे. गेल्या 28 फेब्रुवारीपासून इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे जगातील अनेक देशांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
अमेरिकेसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये नाकेबंदी केली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील आपले सैन्य स्ट्रेट ऑफ होर्मूजच्या मार्गावर तैनात केले आहे. इंधनाच्या वाहतुकीसाठी विशेषत: कच्चं तेल अन् एलपीजी गॅसच्या वाहतुकीसाठी स्ट्रेट ऑफ होर्मूज हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज लागते त्यातील तब्बल 25 टक्के तेलाची वाहतूक याच मार्गाने होते. तर दुसरीकडे भारताला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज लागते त्यातील 40 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे सध्या स्ट्रेट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला नसल्यामुळे जे देश पूर्णपणे कच्च्या तेलासाठी इतर देशांवर अवलंबून आहेत, अशा भारतासारख्या देशावर मोठा दबाव आहे.
मात्र आता एक गुड न्यूज समोर आली आहे, ती म्हणजे इराण आणि ओमान या दोन देशांनी मिळून स्ट्रेट ऑफ होर्मुजसाठी नव्या एन्ट्री आणि एक्जिट मार्गाची रुपरेषा बनवली आहे. याबाबत इराणच्या अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आहे. मस्कटमध्ये होणाऱ्या एका क्षेत्रीय बैठकीमध्ये या नव्या मार्गाबद्दल माहिती देण्यात येणार आहे. इराणच्या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार आता लवकरच स्ट्रेट ऑफ होर्मुजला नवा पर्याय मिळणार आहे. या नव्या मार्गाचं प्रवेशद्वार सुद्धा इराणी समुद्री क्षेत्रात आहे, तर एक्झिट देखील इराणच्याच समुद्री क्षेत्रातच आहे. याचा सर्वाधिक फायदा हा भारताला होणार, एकीकडे रशियाकडून तेलाची खरेदी करू नये,यासाठी अमेरिकेकडून अनेक देशांवर दबाव निर्माण केला जात असतानाच ही एक चांगली बातमी आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या दबावाला झुगारून भारत आणि इराणमधील जवळीक वाढताना देखील दिसत आहे.
