दिल्लीमध्ये CJP चं आंदोलन सुरू असतानाच एसआयआरबाबत सर्वात मोठी बातमी, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. पोलिसांकडून आंदोलकांची धडपकड सुरू आहे. आतापर्यंत अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हे सर्व सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे.

आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना तर पोलिसांनी विमानातूनच ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे सैरभ दास, आशुतोष रांका यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. जंतर -मतंरवर येणाऱ्या आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत आहेत. आतापर्यंत पाचशेहून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान एकीकडे हे सीजेपीचं आंदोलन सुरू असतानाच आता दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे आता मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सोपी झाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेशी संबंधित अतिरिक्त घोषणापत्र सादर करण्याची अट रद्द केली आहे. त्यामुळे आता ज्यांना निवडणूक यादीमध्ये आपलं नाव नव्याने समाविष्ट करायचं आहे, त्यांना आता फॉर्म 6 सोबत अतिरिक्त स्वातंत्र्य घोषणापत्र भरण्याची गरज नाहीये.
दरम्यान यापूर्वी निवडणूक आयोगाकडून असा दावा कारण्यात आला होता की, निवडणूक यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म 6 सोबत जे अतिरिक्त स्वातंत्र्य घोषणापत्र जोडण्यात आलं आहे, त्याला न्यायालयाने मान्यता दिली आहे. परंतु सुप्रीम कोर्टाकडूनच स्पष्ट करण्यात आलं होतं की, अशा कोणत्याही घोषणा पत्राला सुप्रीम कोर्टाकडून परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अडचणीत वाढ झाली होती, दरम्यान आता निवडणूक आयोगाकडून आता एसआयआर फॉर्म 6 सोबत अतिरिक्त स्वातंत्र्य घोषणापत्राची अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे आता निवडणूक यादीमध्ये नाव समाविष्ट करणं अधिक सोपं होणार आहे. याबाबत दैनिक जागरनने वृत्त दिलं आहे.
दुसरीकडे दिल्लीमध्ये आंदोलनक अधिकच आक्रमक झाले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सीजेपीचं जोरदार आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मोठा गोंधळ या ठिकाणी पहायला मिळत आहे.
