AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या मुख्यालयात पाप घडलंय, जनता माफ करणार नाही; अमित शहांचा हल्लाबोल

अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वंदे मातरम गीत अर्ध्यात थांबवल्याचा आरोप करत अमित शहा यांनी काँग्रेसला जनता माफ करणार नसल्याचे भाष्य केलं.

काँग्रेसच्या मुख्यालयात पाप घडलंय, जनता माफ करणार नाही; अमित शहांचा हल्लाबोल
amit shah news
| Updated on: Aug 16, 2026 | 5:29 PM
Share

काँग्रेस कार्यालयातील एका घटनेवरून जोरदार राजकारण पेटलं आहे. या घटनेच्या विरोधात भाजपने जोरदार टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील याच मुद्द्यावरून काँग्रेस आणि खासदार सोनिया गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी राजस्थानच्या एका सभेत वंदे मातरमवरून काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस कार्यालयात पाप घडलं आहे. वंदे मातरम गीत अर्ध्यात थांबवण्यात आलं. त्यामुळे जनता सोनिया गांधी यांना कधीच माफ करणार नाही. राष्ट्रगीत अपूर्ण ठेवण्याचे कोणी स्वप्नातही विचार करू शकतो का? काँग्रेसच्या लोकांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात अमित शहा यांनी टीका केली.

अमित शहा यांनी पुढे म्हटलं की, काँग्रेस निर्लज्ज झाली आहे. काँग्रेसच्या मुख्यालयात वंदे मातरम गीत सुरू होतं. त्याचवेळी सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना गीत रोखण्यास म्हटलं. आम्ही सर्व टीव्हीवर पाहत होतो. 80 वर्षांच्या बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांच्या गीताला पुन्हा सन्मान मिळत आहे. परंतु सोनिया गांधी यांना आवडलं नाही. सोनिया गांधी यांना 140 कोटी लोक बघत आहेत’.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढे म्हटलं की, ‘तुम्ही चूक केली आहे. त्यामुळे देशाची जनता माफ करणार नाही. ही बाब कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही. काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. थोडीतरी लाज शिल्लक राहिली असेल, तर दोन्ही हात जोडून बंकिम बाबू आणि देशाच्या जनतेची माफी मागितली पाहिजे’.

काँग्रेसने काय स्पष्टीकरण दिलं?

वंदे मातरम गीत रोखण्याच्या कथित वादावर काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे. ‘सोनिया गांधी फक्त मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासाठी खुर्ची मागत होत्या’. काँग्रेसवर टीका करताना भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आणि भारतीयांच्या भावना लक्षात घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पहिल्यांदा वंदे मातरम गीत पूर्ण गायले गेले’. भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आहे. ‘वंदे मातरमच्या सुरुवातीच्या ओळींनी सोनिया गांधी नाराज झाल्या. त्यांनी संपूर्ण गीत वाजवू दिले नाही. राहुल गांधी यांनीही थांबवण्याचा इशारा दिला, असा आरोप मालवीय यांनी केला.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...