सीआरपीएफ जवानांना वर्षाला शंभर दिवस कुटुंबासोबत घालवता येणार

सीमेवर देशाचं संरक्षण करताना वैयक्तिक जीवनाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्यामुळे अनेकदा जवानांच्या कुटुंबाची परवड होते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:01 PM, 22 Oct 2019
सीआरपीएफ जवानांना वर्षाला शंभर दिवस कुटुंबासोबत घालवता येणार

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. जवानांना दरवर्षी किमान शंभर दिवस आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता येईल, अशाप्रकारे नियुक्ती करण्याचे आदेश (Amit Shah gift to CRPF Jawan) सीआरपीएफ आणि आसाम रायफल्सच्या महासंचालकांना देण्यात आले आहेत.

सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार सीआरपीएफच्या जवानांना सध्या आपल्या कुटुंबासोबत अंदाजे 75 ते 80 दिवसांचा वेळ घालवता येतो. यामध्ये 60 पगारी रजा आणि 15 कॅज्युअल लीव्ह्सचा समावेश आहे. पहिल्या दोन मुलांच्या जन्मासाठी जवानांना 15 दिवसांची पॅटर्नल लीव्ह (पालकत्वासाठी रजा) मिळण्याची तरतूद आहे.

मतदान न केल्यामुळे अक्षय कुमार ट्विटरवर ट्रोल

शाहा यांनी दिलेल्या सूचना अंमलात आणल्यास जवानांना त्यांच्या कुटुंबांसोबत आणखी वेळ घालवता येईल. यामुळे जवानांना कौटुंबिक जीवनात सुधारणा करण्यास फायदा होणार आहे. सीमेवर देशाचं संरक्षण करताना वैयक्तिक जीवनाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्यामुळे अनेकदा जवानांच्या कुटुंबाची परवड होते.

या निर्णयामुळे जवानांना प्रेरणा मिळेल आणि सरकार आपल्याबद्दल विचार करत असल्याची भावना (Amit Shah gift to CRPF Jawan) त्यांच्या मनात निर्माण होईल, असं मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केलं आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर गृह मंत्रालयाने दिलेल्या या गिफ्टमुळे सीआरपीएफ जवानांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.