AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्वी जनाजे निघायचे, आता मारला की तिथेच… हे मोदी सरकार आहे; अमित शाह यांनी ठणकावले

Amit Shah on J&K Situation : अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ऑपरेशन सिंदूरबद्दल ते बोलतान दिसले. दहशतवाद्यांचे समर्थक आणि नातेवाईक आम्ही शोधून काढले. पासपोर्ट रद्द केले. काही संघटनांवर बंदी आणल्याचेही अमित शाह यांनी म्हटले. पहलगाममध्ये दहशतावद्यांनी पर्यटकांना टार्गेट केले.

पूर्वी जनाजे निघायचे, आता मारला की तिथेच... हे मोदी सरकार आहे; अमित शाह यांनी ठणकावले
amit shah
| Updated on: Jul 29, 2025 | 2:04 PM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर लोकसभेत कालपासून चर्चा सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण करत महत्वाची माहिती दिली. पहलगाम हल्ल्यानंतर काय काय घडले हे त्यांनी सविस्तरपणे सांगत विरोधकांवर जोरदार टीका केली. पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांचा जीव घेणारे दहशतवादी मारले गेले आणि पहलगामचा बदला घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट ही बघायला मिळाली.

अमित शाहांनी काल करण्यात आलेल्या ऑपरेशन महादेव बद्दलही माहिती दिली. अमित शाह बोलताना म्हटले की, पूर्वी जनाजे निघायचे. बुऱ्हाण वाणी मेला. जनाजाला हजारो लोक यायचे. आता जनाजे काढण्यास परवानगी नाही. अतिरेकी मेल्यावर त्याला तिथेच दफन केले जाते. हे आमचे सरकार आहे. नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये जनाजे काढण्याची परवानगी नाहीये. विरोधकांना दहशतवादावर बोलण्याचा अधिकार नसल्याचेही अमित शाह यांनी म्हटले.

दहशतवाद्यांचे समर्थक आणि नातेवाईक आम्ही शोधून काढले. पासपोर्ट रद्द केले. काही संघटनांवर बंदी आणल्याचेही अमित शाह यांनी म्हटले. पहलगाममध्ये दहशतावद्यांनी पर्यटकांना टार्गेट केले. धर्म विचारून कुटुंबियांसमोर पुरूषांवर गोळ्या झाडल्या. या दहशतवादी हल्ल्यात फक्त हिंदू पर्यटकांना अतिरेक्यांनी टार्गेट केले. या दहशतवादी हल्ल्याचे अनेक धक्कादायक व्हिडीओही पुढे आली. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात एक संतापाची लाट आली.

पहलगामवरील हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये अमित शाह हे पहलगामकडे रवाना झाले आणि त्यांनी ज्याठिकाणी हल्ला झाला तिथे भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. ज्यावेळी पहलगामवर झाला झाला, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ही विदेश दाैऱ्यावर होते आणि त्यांनी आपला विदेश दाैरा रद्द करत भारतात दाखल झाले. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी देशभरातून करण्यात आली. काही महिन्यांपासून या दहशतवादी हल्ल्याची प्लॅनिंग सुरू असल्याची माहिती तपासात मिळाली. भारताने जगभरात पाकिस्तानचा बुरखा फाडला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला मोठा धडा शिकवला.

लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.