AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Shah : सोनिया गांधी रडल्या, रडयाचं होतं तर…अमित शाह संसदेत काय म्हणाले?

"दाऊद 1986 मध्ये पळाला. राजीव गांधींचं सरकार होतं. सय्यद सल्लाउद्दीन 83 ला पळाला, टायगर मेमन 83 ला पळाला, अनिस इब्राहीम कासकर 1983 ला पळाला, रियाज भटकळ 2007 मध्ये पळाला, इक्बाल भटकर 2019 मध्ये पळाला, मिर्जा सादाब बेग 2009 मध्ये पळाला यांचं सरकार होतं. माझं उत्तर मागितलं. आमच्या सुरक्षा दलाने माझं उत्तर दिलं. आता राहुल गांधींनी याचं उत्तर द्यावं" असं अमित शाह म्हणाले.

Amit Shah : सोनिया गांधी रडल्या, रडयाचं होतं तर...अमित शाह संसदेत काय म्हणाले?
Amit Shah
| Updated on: Jul 29, 2025 | 1:38 PM
Share

“2002मध्ये वाजपेयी सरकारने पोटा कायदा आणला. त्याला विरोध काँग्रेसने केला. आमच्याकडे बहुमत नव्हतं. पोटा कायदा रोखून काँग्रेस कुणाला वाचवत होते. पोटा तर दहशतवाद्यांच्या विरोधात होता, पोटा रोखून तुम्ही व्होट बँक राखली” अशा शब्दात अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “2004 मध्ये वाजपेयींचं सरकार गेलं. मनमोहन सिंग यांचं सरकार आलं. पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्यांनी पोटा कायदा रद्द केला. कुणाच्या फायद्यासाठी काँग्रेसने पोटा कायदा रद्द केला? त्याचं उत्तर द्या” अशी मागणी अमित शाह यांनी केली.

“2004 च्या डिसेंबरमध्ये पोटा कायदा रद्द झाला. 2005 मध्ये अयोध्येत हल्ला झाला. मुंबईत हल्ला, डोडा उधमपूरमध्ये हिंदूंवर हल्ला, 2007 हैदराबाद स्फोट, यूपी, लखनऊत हल्ला, रामपूर सीआरपीएफ कॅम्प हल्ला, श्रीनगरमध्ये हल्ला, मुंबईत दहशतवादी हल्ला, जयपूरमध्ये हल्ला, अहमदाबादमध्ये 21 हल्ले झाले, दिल्लीत पाच स्फोट झाले, पुण्याच्या जर्मन बेकरीत हल्ला, वाराणासीत हल्ला, पुन्हा मुंबईत तीन स्फोट झाले. दहशतवादाच्या विरोधात लढाई होती. 2005 ते 2011 च्या काळात 27 दहशतवादी हल्ले झाले. हजाराच्यावर लोक मारले गेले. तुम्ही काय केलं?. मी राहुल गांधींना आव्हान दिलं. या दहशतवादी हल्ल्याबाबत यांच्या सरकारने काय केलं ते इथे उभं राहून सांगा. हे इथून पाकिस्तानाला दहशतवाद्यांचे फोटो पाठवत होते. डोजिअर पाठवले” अशा शब्दात अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्ला बोल केला.

पाकिस्तानातून त्यांना अतिरेकी पाठवावे लागत आहेत

“आमच्या काळात झालेले हल्ले पाकिस्ताना प्रेरित आणि काश्मीर सेंट्रीक हल्ले झाले. 2014 ते 2025 पर्यंत एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. हे नरेंद्र मोदी सरकार आहे. काश्मीरमध्येही आजची स्थिती आहे. पाकिस्तानातून त्यांना अतिरेकी पाठवावे लागत आहेत. काश्मीरमध्ये अतिरेकी तयार होत नाहीत” असं अमित शाह म्हणाले.

तुम्हाला काय अधिकार आहे आम्हाला विचारण्याचा?

“मी सलमान खुर्शीद यांना टीव्हीवर रडताना पाहिलं. ते सोनिया गांधींच्या घरातून बाहेर पडले. बाटला हाऊसच्या हल्ल्यामुळे सोनिया गांधी रडल्या. रडयाचं होतं तर शहीद शर्मांसाठी रडायचं होतं. तुम्ही बाटला हाऊसच्या अतिरेक्यांसाठी रडता. तुम्हाला काय अधिकार आहे आम्हाला विचारण्याचा?” असा सवाल अमित शाह यांनी विचारला.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.