Explained : सगळ्यांना वाटलं Impossible पण अमित शाहांनी बंगालमध्ये पॉसिबल करुन दाखवलं, कसं? भाजप चाणक्यच्या या स्ट्रॅटजीसमोर सगळे फेल

West bengal Election Result 2026 : पश्चिम बंगालमध्ये भाजपने एवढा मोठा विजय मिळवणं खूप कठीण होतं. बंगालची संस्कृती, भाषा, हा सुद्धा निवडणुकीतला एक महत्वाचा मुद्दा आहे. पण भाजपने या सर्व आव्हानांवर मात करुन दाखवली, याचं कारण होतं रणनितीकार अमित शाह. त्यांच्या स्ट्रॅटजीसमोर ममता कशा फेल ठरल्या ते समजून घ्या.

Explained : सगळ्यांना वाटलं Impossible पण अमित शाहांनी बंगालमध्ये पॉसिबल करुन दाखवलं, कसं? भाजप चाणक्यच्या या स्ट्रॅटजीसमोर सगळे फेल
Amit Shah
Image Credit source: PTI
| Updated on: May 04, 2026 | 2:06 PM

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपं बाजी मारणार हे चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात पहिल्यांदा भाजपच सरकार येणार आहे. सध्या भाजपकडे 185 पेक्षा जास्त जागांची आघाडी आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. ममता बॅनर्जी यांचा तृणमुल काँग्रेस पक्ष 100 च्या आत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या या ऐतिहासिक विजयात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रणनिती आणि नेतृत्व यांचा महत्वाचा रोल आहे. संपूर्ण निवडणुकीची कमान त्यांच्या हाती होती. हा फक्त निवडणूक लाटेचा विजय नाही, तर अनेक महिन्यांची रणनिती, संघटनात्मक मेहनत आणि जनतेत तळागाळापर्यंत जाऊन काम करणाऱ्या भाजपच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम आहे. इतक्या वर्षानंतर पश्चिम बंगालमध्ये कमळ कसं फुललं? त्यामागे काय फॅक्टर आहेत? ते समजून घ्या.

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या या भव्य विजयासाठी ज्या नेत्यांना सायलेंट हिरो ठरवलं जातय. त्यांची टीम स्वत: अमित शाह यांनी तयार केली होती. सुवेंदू अधिकारी आणि दिलीप घोषण या स्थानिक चेहऱ्यांना पुढे केलं. मंगल पांडेय यांना राज्य प्रभारी बनवणं हा त्या रणनितीचाच भाग होता. अमित शाह यांनी या निवडणुकीसाठी आपल्या जवळच्या नेत्यांवर विश्वास टाकला. रणनिती आखली. अनेक महिने निवडणुकीची पडद्यामागून तयारी केली. हरियाणा आणि महाराष्ट्रानंतर भूपेंद्र यादव यांनी पश्चिम बंगालमध्ये कुशल रणनिती आखून भाजपसाठी अशक्य वाटणारा विजय शक्य करुन दाखवला.

अमित शाह यांना रिपोर्ट करायचे

अमित शाह निवडणुकीदरम्यान जवळपास 15 दिवस पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून होते. याकाळात त्यांनी बूथ स्तरापर्यंत संघटना मजबूत करण्यावर भर दिला. भाजपने राज्यात आपली संघटनात्मक पुनर्बांधणी केली. या रचनेत स्थानिक नेत्यांना पुढे करुन कार्यकर्त्यांना सक्रीय केलं. सुनील बन्सल अनेक महिने बंगालमध्ये होते. त्यांनी संघटना भक्कम करण्यावर जोर दिला. बिप्लब कुमार देब सहप्रभारी म्हणून सक्रीय होते. हे सर्व नेते अमित शाह यांना रिपोर्ट करायचे. परिणामी पक्षाने अनेक भागात आपली संघटनात्मक पकड घट्ट केली . त्याचा फायदा पक्षाला या निवडणुकीत झाला.

भाजपने कुठले मुद्दे उचलले?

भाजपने कायदा-सुव्यवस्था, राजकीय हिंसाचार या सारखे मुद्दे प्रामुख्याने उचलले. भाजपने पश्चिम बंगाल निवडणुकीत प्रामुख्याने घुसखोरी आणि CAA सारखे मुद्दे उचलले. बंगालमध्ये बांग्लादेशातून होणारी बेकायद घुसखोरी एक मोठा मुद्दा आहे. भाजपने हा मुद्दा लावून धरला. भाजप सरकार आल्यानंतर CAA लागू करणार हे सुद्धा सांगितलं. कायदा-सुव्यवस्था बळकट करणारं हे आश्वासन दिलं.

अमित शाह यांनी काय शब्द दिला?

अमित शाह यांनी महिला सुरक्षेला मोठा मुद्दा बनवला. तृणमुल काँग्रेसवर त्यांनी भ्रष्टाचार, कट-मनी, राजकीय हिंसाचार आणि कुशासनाचे आरोप केले. भाजप सत्तेवर आल्यास गुंतवणूक, उद्योग आणि सुरक्षेत सुधारणा होईल हा शब्द दिला. अमित शाह यांनी सत्ताधारी तृणमुल काँग्रेस विरोधात आक्रमक प्रचार अभियान राबवलं. त्यांनी फक्त सभाच घेतल्या नाहीत, तर कोलकातामध्ये रणनितीक बैठका घेऊन शेवटपर्यंत स्थितीवर लक्ष ठेवलं. पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतरच अमित शाह बोललेल की आम्ही जिंकणार ते आता खरं होताना दिसतय.

Follow Us