AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेग अन् सुविधा वंदे भारतसारख्या, भाडेमात्र एक्सप्रेसपेक्षाही कमी अन् सुटसुद्धा मिळणार

vande bharat express | देशात सर्वसामान्य प्रवाशांसाठी नवीन ट्रेन सुरु झाली आहे. या ट्रेनच्या भाडे सर्वसामान्य ट्रेनपेक्षा कमी आहे. परंतु सुविधा मात्र वंदे भारत ट्रेनसारख्या आहेत. यामुळे या रेल्वेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळला आहे.

वेग अन् सुविधा वंदे भारतसारख्या, भाडेमात्र एक्सप्रेसपेक्षाही कमी अन् सुटसुद्धा मिळणार
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 08, 2024 | 2:48 PM
Share

नवी दिल्ली, दि. 8 जानेवारी 2024 | देशात सर्वात वेगाने बदल रेल्वे मंत्रालयात सुरु आहे. भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण सुरु आहे. रेल्वेने कात टाकत सेमीहायस्पीड असलेली वंदे भारत एक्स्प्रेस आणली आहे. ही रेल्वे कमालीची लोकप्रिय झाली आहे. परंतु या रेल्वेचे भाडे एक्स्प्रेसपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी अमृत भारत ट्रेन आणली आहे. देशातील पहिल्या अमृत भारत ट्रेनला सुरुवात अयोध्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. रेल्वे प्रवाशांसाठी ही रेल्वे म्हणजे ‘अमृत’ म्हटली जात आहे. या रेल्वेत अनेक प्रकारच्या सुट मिळणार आहे.

काय आहेत सुविधा

रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना नवीन रेल्वे उपलब्ध करुन दिली आहे. अमृत भारत नावाने धावणाऱ्या या एक्स्प्रेसचा वेग 130 किमी प्रती आहे. या रेल्वेमध्ये अनेक सुविधा वंदे भारत सारख्या आहेत. तिला दोन्ही बाजूला पॉवरफुल इंजिन आहे. यामुळे कमी वेळात तुमचा प्रवास पूर्ण होणार आहे. या ट्रेनच्या कोचची डिझाइन अशा पद्धतीने केली आहे की, प्रवाशांना धक्के बसणार नाही. या ट्रेनमध्ये एकूण 22 कोच आहेत.

सुविधा जास्त तिकीट कमी

अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेनचे तिकीट इतर एक्स्प्रेसपेक्षा कमी आहे. या रेल्वेचे तिकीटच कमी नाही तर नवीन सुटही प्रवाशांना दिली आहे. या रेल्वेत ‘सुपरफास्‍ट चार्जेज’ लागणार नाही. प्रवाशांना ‘सुपरफास्‍ट चार्जेज’ म्हणून 30 ते 45 रुपये द्यावे लागतात. परंतु अमृत भारतमधून जाताना ‘सुपरफास्‍ट चार्जेज’ची सुट दिली आहे.

दरवर्षी येणार 400 अमृत भारत एक्स्प्रेस

देशात दरवर्षी 400 अमृत भारत एक्स्प्रेस येणार आहे. देशातील रेल्वे ट्रॅक सेमीहायस्पीड रेल्वेला अनुकूल केले जात आहेत. मागील 9.5 वर्षांत रेल्वेने 26 हजार किलोमीटर ट्रॅक वाढले आहेत. तसेच सरकारने 30,749 कोटी रुपये खर्च करुन रेल्वे ट्रॅकचे दुहेरीकरण केले आहे. देशातील 400 रेल्वे स्टेशन पूर्ण बदलले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, अमृत भारत एक्स्प्रेसचे भाडे कमी आहे. सुविधा मात्र वंदे भारत ट्रेनसारख्या आहेत. या रेल्वेत बाहेरचा गोंधळ आणि हवेचाही त्रास होत नाही.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?