वारसदाराच्या बातम्यांना पूर्णविराम ? दलाई लामा म्हणाले, मी आणखी ३० ते ४० वर्षे जगू शकतो
तिबेटी बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांचा उद्या ६ जुलै रोजी वाढदिवस आहे. ते आता नव्वदी गाठणार असल्याने त्यांचा वारसदार ते जाहीर करतील असे म्हटले जात होते. परंतू शनिवारी त्यांनी या सर्व वावड्यांवर पूर्ण विराम लावणारे वक्तव्य केले आहे.

तिबेटचे सर्वोच्च बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांचा ६ जुलैला रोजी वाढदिवस असून ते ९० वर्षांचे होणार आहेत. दलाई लामा त्यांचा वारस जाहीर करणार असे म्हटले जात आहे. याकडे शेजारील देश चीनचेही लक्ष लागले आहे. असे असताना आता दलाई लामा यांनी त्यांचा वारसदार जाहीर होणार का ? या प्रश्नावर अजून मी ३० ते ४० वर्षे जगू शकतो आणि मानवतेसाठी काम करु शकतो असे म्हटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे दलाई लामा यांचा वारसदार म्हणून नवा दलाई लामा कोण होणार याबद्दल गुढ कायम आहे.
१४ वे दलाई लामा तेनजिन ग्यात्सो अनेक दशके भारतातील हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे राहात आहेत. ते आता ९० व्या वाढदिवसाला आपला उत्तराधिकारी जाहीर करतील असे म्हटले जात होते. परंतू त्यांनी स्वत:च अजून मला जगायचं आहे आणि ३० ते ४० वर्षे मी जगू शकतो असे म्हणत १५ व्या लामाबद्दल सस्पेन्स कायम ठेवला आहे. दलाई लामा यांनी शनिवारी मॅकडलोडगंज येथील मुख्य तिबेटी मंदिर त्सुगलागखांग येथे आयोजित एका दीर्घायु प्रार्थना कार्याक्रमा दरम्यान हे वक्तव्य केले आहे. जे त्यांच्या ८९ व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला केले आहे.
मला ईश्वरीय मार्गदर्शन मिळत आहे
या कार्यक्रमात उपस्थित अनुयायी आणि बौद्ध भिक्खूंना संबोधित करताना दलाई लामा म्हणाले की मला स्पष्टपणे संकेत मिळाले आहे की जे हे दर्शवत आहेत की अवलोकितेश्वर ( तिबेटी बौद्ध परंपरेतील करुणेचे प्रतीक असलेली देवता ) यांची कृपा माझ्यावर आहे. ते म्हणाले की अनेक भविष्यवाणी आणि आध्यात्मिक अनुभूतींना ध्यानात घेता,मला हे जाणवत आहे की मला ईश्वरीय मार्गदर्शन मिळत आहे. मी संपूर्ण निष्ठेने कार्य केले आहे आणि भविष्यातही करीत राहणार आहे.
मी जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत …
आपल्या निर्वासित आयुष्याबद्दल बोलताना दलाई लामा म्हणाले की, “आमचा देश आमच्याकडू हिसकावून घेतला, परंतू भारताच्या भूमिवर राहूनही मी बौद्ध धर्म प्रसार आणि लोकांच्या उत्थानसाठी कार्य जारी ठेवले आहे. विशेष म्हणजे धर्मशाला येथे राहूनही हे केले. मी अनेक जीवात्म्यांच्या कल्याणाचे माध्यम बनू शकलो, मी जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत या उद्देश्यानेच जीवन जगू इच्छीत आहे. आणि याहून अधिक लोकांची सहायता करणार आहे.”
उत्तराधिकाऱ्याची चर्चा संपुष्ठात
दलाई लामा यांनी यावेळी त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांबद्दल कोणतीही औपचारिक घोषणा केली नसली तरी, त्यांनी हे स्पष्ट केले की सध्या त्यांचे लक्ष उत्तराधिकारी निवडण्यावर नाही, तर त्यांच्या आयुष्यातील उर्वरित काळ सेवा आणि साधनासाठी समर्पित करण्यावर आहे. यामुळे या विषयावर तिबेटी समुदायात सुरू असलेली चर्चा सध्या तरी संपुष्टात येतील असे म्हटले जात आहे.