AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला मोठा दणका! भारताची अतिसंवेदनशिल माहिती पाकिस्तानकडे, वायुसेनेच्या..

भारताची झोप उडवणारी माहिती पाकिस्तानात पाठवण्यात आली. एका विंग कमांडरने पाकिस्तानात भारताच्या वायुसेनेची अत्यंत संवेदनशिल माहिती पाकिस्तानात पाठवली. यासोबतच या विंग कमांडरच्या मोबाईलमध्ये असे काही सापडले की, ते पाहून अधिकाऱ्यांचे डोके चक्रावले.

भारताला मोठा दणका! भारताची अतिसंवेदनशिल माहिती पाकिस्तानकडे, वायुसेनेच्या..
Indian Air Force
| Updated on: Aug 08, 2026 | 2:18 PM
Share

दिल्ली पोलिसांकडे दोन महिन्यांपुर्वी एक धक्कादायक प्रकरण आले, ज्यानंतर देशाला धक्का बसला. भारतीय एअरफोर्सची अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानमध्ये पाठवली जात होती. या प्रकरणात एअरफोर्सच्या विंग कमांडर अटक करण्यात आला. आता त्याच्याकडून धक्कादायक खुलासे होते आहेत, या विंग कमांडरच्या माध्यमातून थेट भारताची महत्वाची माहिती पाकिस्तानमध्ये पाठवली जात होती. अधिकाऱ्यांनी सुरक्षा अधिनियम कायद्यानुसार अगोदर गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, विंग कमांडर आपल्या खासगी आयुष्यात अत्यंत अडचणीचा सामना करत होता. यादरम्यानच त्याची ओळख सोशल मीडियावर एका महिलेशी ओळख झाली. विंग कमांडर आणि महिलेमधील संवाद वाढला.

महिलेने विंग कमांडरचा विश्वास मिळवला. यानंतर ही महिला हळूहळू करून भारताची अत्यंत संवेदनशिल माहिती मिळू लागली. हेच नाही तर विंग कमांडरसोबत ती अनेकदा भारताच्या रक्षा यूनिट्सपर्यंत जाऊन आली. विंग कमांडरवर आरोप आहे की, त्याने अत्यंत गोपनीय वायुसेनेची माहिती पाकिस्तानच्या हॅंडलर्सला दिली. विंग कमांडरला अटक केल्यानंतर त्याच्या सर्व गोष्टींवर बारीक नजर ठेवण्यात आली.

विंग कमांडरने याच महिलेच्या माध्यमातून पाकिस्तानी हॅंडलर्सला महत्वाचे कागदपत्रे पाठवली. आता याची माहिती सुरक्षा संस्थांकडून घेतली जात आहे की, या विंग कमांडरने नक्की कोणते कागदपत्रे पाकिस्तानला पाठवली. अधिकाऱ्यांनी मोठा खुलासा करत सांगितले की, त्यांना विंग कमांडरच्या मोबाईलमध्ये एक अॅप मिळाले. ज्याच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये फोटो, व्हिडीओ पाठवली जात होती. यासोबतच काही कागदपत्रेही पाठवण्यात आलीत. विंग कमांडरने भारताची अत्यंत संवेदनशिल माहिती पाकड्यांना पाठवल्याचे कळतंय.

वायुसेनेने हे सर्व प्रकरण स्थानिक पोलिसांकडे दिले. त्यानंतर 31 मेला विंग कमांडरला अटक करण्यात आली. अजूनही धक्कादायक खुलासे विंग कमांडरकडून होऊ शकतात. एजन्सीकडून विंग कमांडरची चाैकशी केली जातंय. या प्रकारानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. नक्की कोण कोणती भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आली, याची चाैकशी केली जात आहे. तिहार जेलमध्ये विंग कमांडकरची रवानगी करण्यात आली. अजूनही काही लोक यामध्ये सहभागी असू शकतात असा अंदाज आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी