
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत हे अंदमान आणि निकोबारच्या दौऱ्यावर आहेत. दोघेही शुक्रवारी येथे एकाच मंचावर असतील. या दोघांशिवाय इतरही अनेक मान्यवर येथे उपस्थित असतील. शाह आणि भागवत हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ कवितेला 116 वर्षे झाली आहेत. त्यानिमित्ताने येथे कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यात हे दोन्ही नेते सहभागी होतील. येथे ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील.
सागरा प्राण तळमळला
सावरकर यांची ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ही प्रसिद्ध कविता लिहिण्यास 116 वर्षे पूर्ण झाली आहे. त्यानिमित्ताने या कवितेचे गायन आणि त्याचा भावार्थ जाणून घेण्यात येत आहे. सावरकरांनी वर्ष 1909 मध्ये ही कविता लिहिली होती. भारत मातेच्या आठवणीत त्यांनी ही कविता गुंफली होती. काळापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी ते अंदमान-निकोबार येथील काळकोठडीत होते.
रणदीप हुड्डा यांच्यासह अनेक दिग्गजांची हजेरी
केंद्रशासीत प्रदेशात आज कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. काही ठिकाणी वाहतूक बंदी करण्यात आली आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आशिष शेलार यांच्यासह प्रसिद्ध संगितकार हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट अभिनेता रणदीप हुड्डा आणि इतिहासकार विक्रम संपत हे पण सहभागी होत आहे.
अंदमानमध्ये आज काय काय कार्यक्रम
अमित शाह आणि भागवत आज दुपारी 2.30 वाजता दक्षिण अंदमानातील ब्योदनाबाद येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील आणि 3.15 वाजता डॉ. बी. आर आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (DBRAIT) मध्ये सावरकर यांच्या सागरा प्राण तळमळला या कवितेला 116 व्या वर्षानिमित्त कार्यक्रमात सहभागी होतील. सरसंघचालक पदी आल्यानंतर मोहन भागवत यांचा हा पहिलाच अंदमान निकोबार दौरा आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हा दुसरा दौरा आहे.
उद्या हिंदू संमेलनात होणार सहभागी
संघ प्रमुख भागवत उद्या शनिवारी श्री विजया पुरम येथील नेताजी स्टेडियम मध्ये ‘विराट हिंदू संमेलनाला’ संबोधित करतील. याशिवाय भागवत हे रविवारी सकाळी जवळपास 10 वाजता DBRAIT मध्ये एका अजून कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर दुपारी जवळपास 2 वाजता ते अंदमान-निकोबार येथे येतील. इंग्रजांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली होती. त्यांना पोर्ट ब्लेयर येथील सेल्युलर तुरुंगात अंधार कोठडीत ठेवण्यात आले होते. इंग्रजांनी त्यांना 50 वर्षांची शिक्षा सुनावली होती. पण नंतर त्यांना सोडण्यात आले होते.