Fact Check : भारतात पुन्हा कोरोनाने दोघांचा मृत्यू? सत्य काय? महत्वाची माहिती समोर
andhra pradesh : भारतात कोरोनाने पुन्हा एन्ट्री दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

आंध्र प्रदेशात कोरोनामुळे 4 वर्षांपूर्वी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आंध्रपदेशच्या कडप्पा जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आहे. तर 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचा दावा सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यातील काही जणांना घरात विलगीकरणात ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय, परंतु सोशल मीडियावरील हा दावा अर्धसत्य आणि खोटे असल्याचं समोर आलं आहे.
आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) दोघांचा खरंच कोरानामुळे मृत्यू झाला आहे का, याची फॅक्ट चेक टीमने पडताळणी केली. त्यानंतर टीमने मोठा खुलासा केला. आंध्रप्रदेशात कोणत्याही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झालेला नाही. आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात कोविड झाल्याची नोंद केलेल्या रुग्णांकडे प्रशासनाचं बारकाईने लक्ष आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. परंतु खोटी माहिती पसरवणे आणि लोकांमध्ये भीती निर्माण करणे गुन्हा आहे, असा इशारा प्रशासनाने नेटकऱ्यांना दिला आहे.
सरकारी जाहीर केलेल्या तपशिलानुसार, कडप्पा जिल्ह्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत. वीरा रेड्डी यांच्यावर मधुमेह, उच्च रक्तदाबाचे उपचार सुरू होते. आजारातून बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जी. कोंडय्या यांच्यावर शासकीय रुग्णालयात मधुमेह, क्षयरोग, इतर आजारांवर उपचार सुरू आहेत. अक्षत (25) यांना कोरोनाची (Corona) सोम्य लक्षणे असल्याने त्यांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
दोघांना होते गंभीर आजार
एन. सुब्बारायुडू (52) हे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने त्रस्त होते. गंभीर आजारामुळे 28 जून त्यांचं निधन झालं. सय्यद मबाशा हे दीर्घकाळ मद्यपानाचे व्यसन होते. या व्यसनामुळे त्यांना गंभीर आजार झाला होता. त्यामुळे त्यांचं 7 जुलै रोजी निधन झालं. सरकारच्या (Government) दाव्यानुसार, दोन्ही मृत रुग्णांना दीर्घकालीन आजाराच्या समस्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला कोरोनाचे कारण देणे योग्य नसल्याचे सांगण्यात आलं आहे. या रुग्णांचे नमुने हे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.