AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळ आलेला, इतका भयानक अपघात की बसचा फक्त सांगाडा उरला, 10 लोक जिवंत जळाले

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फायरब्रिगेडचे लोक घटनास्थळी पोहोचले व आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच दोन्ही वाहनं आगीत जळून खाक झाली होती.

काळ आलेला, इतका भयानक अपघात की बसचा फक्त सांगाडा उरला, 10 लोक जिवंत जळाले
Bus Accident
| Updated on: Mar 26, 2026 | 9:12 AM
Share

लाकडाच्या खाणीजवळ एक भीषण अपघात झाला. ट्रकने एका खासगी बसला जोरदार धडक दिली. यानंतर बसने लगेच पेट घेतला. या आगीत बस जळून खाक झाली. या दुर्घटनेत 10 लोक जिवंतपणी जळाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व त्यांनी मदत, बचाव कार्य सुरु केलं. अपघाताच्यावेळी बसमध्ये किती प्रवासी होते? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांच्या सांगण्यांनुसार मृतकांची संख्या आणखी वाढू शकते. आंध्र प्रदेशच्या मार्कपुरम जिल्ह्यात रायवरम येथे हा भीषण अपघात झाला.

वेगामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. ट्रकने बसला धडक दिल्यानंतर बस डिवायडरला धडकून पलटी झाली. बसला अचानक आग लागल्याने आतील प्रवाशांना पळण्याची संधीच मिळाली नाही. या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक प्रवेशांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून मृतकांची संख्या वाढू शकते.

बस कुठे चाललेली?

हैदराबादवरुन ही खासगी बस पामुर येथे चाललेली. चिमाकुर्थीवरुन बाजरी घेऊन जाणारा टिपर ट्रक आणि खासगी बसची आमने-सामने धडक झाली. धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. आगीत दोन्ही वाहनं जळून खाक झाली. खासगी बसमध्ये 40 प्रवासी असल्याची माहिती मिळतेय. यातील 10 जणांचा जळून मृत्यू झाला. 12 जण जखमी झालेत. 20 जण गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय.

फायरब्रिगेडचे जवान पोहोचले, पण..

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फायरब्रिगेडचे लोक घटनास्थळी पोहोचले व आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच दोन्ही वाहनं आगीत जळून खाक झाली होती. या अपघातात मरण पावलेल्यांमध्ये बहुतांश नागरिक हे कनिगिरी आणि पामुर येथील निवासी होते. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचवलं. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?