AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AP Municipal Eelection Result : आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डींचाच डंका, स्थानिक निवडणुकांमध्ये एकहाती विजय

वायएसआर काँग्रेसनं विरोधी पक्ष असलेल्या तेलगु देसम पार्टीचा मोठा पराभव केलाय. वायएसआर काँग्रेसच्या या विजयाचा स्थानिक नागरिक 'जनश वाश' असा उल्लेख करत आहेत.

AP Municipal Eelection Result : आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डींचाच डंका, स्थानिक निवडणुकांमध्ये एकहाती विजय
| Updated on: Mar 14, 2021 | 10:30 PM
Share

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. 75 नगरपालिका आणि 11 नगर परिषदांमध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसनं विरोधी पक्ष असलेल्या तेलगु देसम पार्टीचा मोठा पराभव केलाय. वायएसआर काँग्रेसच्या या विजयाचा स्थानिक नागरिक ‘जनश वाश’ असा उल्लेख करत आहेत.(Big victory for YSR Congress in Andhra Pradesh municipal elections)

तेलगु देसम पार्टी फक्त 5 जागांवर दोन आकडी संख्या गाठू शकली आहे. तर भाजप आणि जेएसपीला अगदी थोडा फायदा झाल्याचं दिसतंय. काँग्रेस तर या निवडणूक निकालात दूरदूरपर्यंत दिसून येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील विजयानंतर जनग मोहन रेड्डी यांनी ट्वीट केलं आहे. ‘हा मोठा विजय जनतेला समर्पित आहे. सर्व भगिनी, भाऊ, दोस्त, आजी, आजोबांच्या आर्शीवाद आणि प्रार्थनेमुळे हा विजय मिळू शकला. या विजयामुळे तुमचा विश्वास आणि माझी जबाबदारी वाढवली आहे. जिंकलेल्या सर्व बंधू-भगिनींना माझ्या शुभेच्छा’, अशा शब्दात जगन मोहन रेड्डी यांनी जनतेचे आभार मानले आहेत.

तेलगु देसम पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एक ट्वीट करुन पक्ष कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘निवडणूक निकालामुळे हताश होण्याची गरज नाही. आम्ही धमक्या, सत्तेचा दुरुपयोग आणि प्रलोभनानंतरही चांगली लढाई केली आहे’, असं चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलंय.

असदुद्दीन ओवेसींच्या AIMIMने खातं उघडलं

दुसरीकडे आंध्र प्रदेश नगर पंचायत निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM ने खातं उघडलं आहे. हिंदुपूर वार्डात AIMIMच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे.

इतर बातम्या :

बाबुल सुप्रियोंसह चार खासदारांना विधानसभेचं तिकीट; बंगाल सर करण्यासाठी भाजपची खेळी!

West Bengal Election 2021 : ‘जखमी वाघिण जास्त घातक असते’, व्हीलचेअरवरुन ममता बॅनर्जींची डरकाळी!

Big victory for YSR Congress in Andhra Pradesh municipal elections

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.