Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना शनिची दशा पडली भारी? ‘प्रपोज डे’ च्या दिवशी रिजेक्ट झाले

2013 मध्ये अरविंद केजरीवाल जिंकले तेव्हा रविवार होता. 2015 मध्ये,'आप'ला मंगळवारी विजय मिळवला. 2020 मध्येही जेव्हा अरविंद केजरीवाल जिंकले तेव्हा देखील मंगळवार होता. 2022 मध्ये जेव्हा 'आप'चे पंजाबमध्ये खाते उघडले तेव्हा गुरुवार होता. यावेळी अरविंद केजरीवाल हरलेत तो नेमका शनिवार आहे.

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना शनिची दशा पडली भारी? 'प्रपोज डे' च्या दिवशी रिजेक्ट झाले
Follow us
| Updated on: Feb 08, 2025 | 7:11 PM

दिल्लीकरांना अनेक योजनांमधून खूश करणारे रेवडी सम्राट अरविंद केजरीवाल यांच्यावर अखेर शनिची अवकृपा झाली आहे. या प्रश्न दोन कारणांसाठी विचारला जात आहे. गेल्या १२ वर्षांत दिल्ली निवडणूकांचा निकाल पहिल्यांदाच शनिवारी लागला आहे. चर्चेचा दुसरा मुद्दा हा की आपचा राजकीय परफॉर्मन्सचा देखील आहे. केजरीवाल यांच्या पक्षाला जेव्हा कधी विजय झाला तेव्हा शनिवार नव्हता..

मजेशीर आणि इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे अरविंद केजरीवाल यांना शनिची दशा भारी पडली काय ? असा सवाल राजकीय धुरीणांना पडला आहे. तब्बल एक तप झाले शनिवारी यापूर्वी कधी दिल्ली निवडणूकांचा निकाल लागलेला नाही.विशेष म्हणजे दर वेळी केजरीवाल यांना वॅलेंटाईन विक नेहमी लकी सिद्ध झाला आहे. पंरतू केजरीवाल यांना नागरिकांना प्रपोज डेच्या दिवशीच नाकारले आहे.

हरल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपले म्हणणे प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केले आहे. केजरीवाल म्हणाले की आम्ही पराभवाचा अभ्यास करु, जनतेचा जो काही निकाल आहेत तो आम्हाला मान्य आहे.आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलेलोच नाही असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

शनि पडला भारी ?

दिल्लीत शनिवारी लागलेल्या विधानसभा निकालात अरविंद केजरीवाल स्वत: हारले आहेतच शिवाय त्यांच्या पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागेल. अरविंद केजरीवाल यांच्या सोबत त्यांचे विश्वासू मनिष सिशोधीया, सोमनाथ भारती सारख्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे.

1. अरविंद केजरीवाल यांनी 26 नवंबर 2012 रोजी आप पार्टीची स्थापना केली. तो दिवस सोमवार होता. स्थापनेच्या 13 महीन्यांनंतर झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणूकात अरविंद यांची पार्टी आपने चमत्कार केला.त्यांचा पक्षाने पहल्यांदा दिल्ली विधानसभेत 70 पैकी 28 जागी विजय मिळविला.

2. दिल्लीच्या 2013 विधानसभा निवडणूकांचे निकाल 8 डिसेंबर 2013 रोजी लागले. त्या दिवशी रविवार होता. आणि आपला बंपर विजय मिळाला.या विजयानंतर अरविंद केजरीवाल प्रथमच दिल्लीचे मुख्यमंत्री बनले. केजरीवाल त्यानंतर सुमारे 10 वर्षे दिल्लीचे मुख्यमंत्री होते.

3. केजरीवाल यांनी 2014 सुरुवातीला राजीनामा दिला होता.लोकपालच्या मुद्द्यावर राजीनामा दिला..त्यानंतर फेब्रुवारी 2015 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूकांत आपचा 70 पैकी 67 जागांवर विजय झाला.त्या दिवशी मंगळवार होता.

4. 2020 मध्ये अरविंद केजरीवाल यांची पार्टी पुन्हा विजयी झाली. अरविंद यांच्या आपने 62 जागांवर विजय मिळविला. 2020 मध्ये 11 फेब्रुवारी निवडणूकांचे निकाल त्या दिवशी मंगळवार होता.

5. 2022 च्या मार्च महीन्यात पंजाब निवडणूकांचा निकाल लागला. 10 मार्च रोजी पंजाबात आम आदमी पार्टीला विजय मिळाला त्यादिवशी गुरुवार होता. आपने पंजाबात मोठा विजय मिळविला, दिल्लीनंतर पंजाब दूसरे राज्य होते जेथे आपला झेंडा गाठला गेला.

6. 2022च्या डिसेंबरमध्ये दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणूकात देखील आम आदमी पार्टीचा विजय झाला. आपला प्रथमच दिल्ली एमसीडी निवडणूकीत विजय मिळाला. एमसीडीच्या निवडणूकांचा निकाल बुधवार लागला.

7. आम आदमी पार्टीचा जन्मल्यानंतर एकदाही शनिवारी विधानसभा निवडणूकांचे निकाल लागलेले नाहीत. यंदा प्रथमच शनिवारी निकाल लागले. आणि पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आपला सर्वात कमी जागांवर विजय

2013 मध्ये आम आदमी पार्टीला 28, 2015 मध्ये 67 आणि 2020 मध्ये 62 जागांवर विजय मिळाला आहे. यंदा  आम आदमी पार्टीला 25 आकडाही पार करता आलेला नाही.आम आदमी पार्टीचे मोठमोठे नेते निवडूकीत हरले आहेत.

राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी
राडा, जाळपोळ.. अन् तणावपूर्ण शांतता; नागपुरात 11 ठिकाणी संचारबंदी.
मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल
मुख्यमंत्र्यांचा नागपूरच्या जखमी पोलिसांना व्हिडिओ कॉल.
फडणवीसांची पहिल्यांदाच नितेश राणेंना तंबी, 'त्या' विधानावरून फटकारलं
फडणवीसांची पहिल्यांदाच नितेश राणेंना तंबी, 'त्या' विधानावरून फटकारलं.
'राणेंना महाराष्ट्र जाळायचाय का?', महिला खासादारानं थेट सवाल करत झापल
'राणेंना महाराष्ट्र जाळायचाय का?', महिला खासादारानं थेट सवाल करत झापल.
खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं
खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं.
'फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की..'; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप
'फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की..'; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप.
नागपुरातील राड्यानंतर शिंदेंनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं
नागपुरातील राड्यानंतर शिंदेंनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं.
'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार
'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार.
'...तो पुरूष नाहीच', सुळेंची मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा
'...तो पुरूष नाहीच', सुळेंची मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा.
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी.