AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी इंजिनीअरिंगचा विद्यार्थी, युतीचा प्रयोग करुन पाहिला : अखिलेश यादव

भाजपला हरवण्यासाठी एकत्र आलेल्या सपा आणि बसपा यांची युती पाच महिन्यातच तुटली. युती तोडण्याची घोषणा करताना बसपा प्रमुख मायावती यांनी सपावर काही आरोपही केले आहेत.

मी इंजिनीअरिंगचा विद्यार्थी, युतीचा प्रयोग करुन पाहिला : अखिलेश यादव
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jun 05, 2019 | 6:39 PM
Share

लखनौ : उत्तर प्रदेशात भाजपला शह देण्यासाठी एकत्र आलेल्या सपा आणि बसपा यांची युती औटघटकेची ठरली. ही युती निवडणुकीपुरतीच आहे, असा दावा भाजपकडून केला जात होता आणि भाजपची भविष्यवाणी अखेर खरी ठरली. बसपा प्रमुख मायावती यांनी आगामी पोटनिवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. एक इंजिनीअरिंगचा विद्यार्थी म्हणून प्रयोग करुन पाहिला, असं उत्तर त्यांनी दिलंय.

सपाला यादवांची मतं मिळवता आली नाही, अखिलेश यादव यांना त्यांच्या पत्नीलाही जिंकून आणता आलं नाही, असा आरोप मायावती यांनी केला होता. युती तुटल्याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असं उत्तर यापूर्वी अखिलेश यादव यांनी दिलं होतं. मायावती यांनी उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या 11 जागांसाठी होणारी पोटनिवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या 10 वर्षांपासून बसपाने एकही पोटनिवडणूक लढवलेली नाही. पण यावेळी ही भूमिका बदलली आहे.

मायावती यांनी निकालानंतर पहिल्यांदाच पक्षाची बैठक घेतली आणि युतीचा कोणताही फायदा झाला नसल्याचं सांगितलं. यादवांची मतं मिळाली नाही. जर ही मतं मिळाली असती तर सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या कुटुंबातलेच लोक हरले नसते. सपाच्या कित्येक लोकांनी युतीविरोधात काम केलं. मुस्लिमांनी आपल्याला पूर्ण साथ दिली, असं मायावती म्हणाल्या.

उत्तर प्रदेशातील अनेक आमदार खासदार म्हणून निवडून गेले आहेत. दोन्ही सभागृहांसाठी निवड झाल्यानंतर एक जागा रिक्त करणं अनिवार्य आहे. रिक्त जागेवर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेतली जाते. उत्तर प्रदेशातील अनेक आमदार हे खासदार झाल्यामुळे पोटनिवडणूक होणार आहे.

रामपूर सदर, जलालपूर, बलहा, जैदपूर, माणिकपूर, गंगोह, प्रतापगड, गोविंद नगर, लखनौ कँट, टुडला, इगलास, हमीरपूर या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत इथे भाजपने 71 जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी सपा आणि बसपाचं आव्हान असेल असा अंदाज लावला जात होता. पण भाजपने सर्व अंदाज खोटे ठरवत दणदणीत यश मिळवलं. तरीही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काही जागा मात्र कमी झाल्या आहेत. यावेळी भाजपने 62, सपा-बसपा 15, काँग्रेस 01 आणि अपना दलने 02 जागा जिंकल्या आहेत.

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...