पत्नीने ‘हे’ खायला घातले म्हणून… जीवन संपवल्यानंतर 2 महिन्यांनी फेसबुक पोस्ट समोर, वाचाल तर बसेल धक्का..

| Updated on: Aug 29, 2022 | 9:21 PM

पीडित रोहित प्रताप सिंह याने फाशीने गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर त्याची सुसाईड नोट पोस्ट केली होती. आता त्याच्या आत्महत्येनंतर दोन महिन्यांनी ही सुसाईड नोट समोर आली आहे. त्यानंतर गुजरात पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे

पत्नीने हे खायला घातले म्हणून... जीवन संपवल्यानंतर 2 महिन्यांनी फेसबुक पोस्ट समोर, वाचाल तर बसेल धक्का..
दोन महिन्यांनी कारण समोर
Image Credit source: social media
Follow us on

सुरत – आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या ( Youth )पत्नी आणि मेव्हणाच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तरुणाने बायको (wife)आणि तिच्या भावामुळे आत्महत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. सासरच्यांनी बीफ (beef)खाण्यासाठी जबरदस्ती केली, त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पीडित रोहित प्रताप सिंह याने फाशीने गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर त्याची सुसाईड नोट पोस्ट केली होती. आता त्याच्या आत्महत्येनंतर दोन महिन्यांनी ही सुसाईड नोट समोर आली आहे. त्यानंतर गुजरात पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे.

मृत रोहितने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, जेव्हा त्याने बिफ खाण्यास नकार दिला तेव्हा त्याला धमकी देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

काय लिहिले आहे सुसाईड नोटमध्ये?

रोहित प्रताप सिंह याने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की- मी हे जग सोडून जात आहे. माझी पत्नी सोनम अली आणि तिचा भाऊ अख्तर अली, हे दोघेही माझ्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत. माझ्या सगळ्या मित्रांना माझी विनंती आहे की, मला न्याय मिळवून द्या. मला जीवे मारण्याची धमकी देत बिफ खाऊ घालण्यात आले. मी आता या जगात राहण्याच्या लायक नाही. त्यामुळे मी आता आत्महत्या करीत आहे.

रोहितच्या नातेवाईकांना दोन महिन्यांनी त्याच्या या सुसाईड नोटबद्दल माहित झाले. त्यानंतर त्यांनी सूरत पोलिसांशी संपर्क केला.

सोनम आणि रोहितचे कसे झाले लग्न ?

रोहित राजपूत आणि सोनम हे दोघेही सूरतमध्ये एकत्र काम करीत होते. तिथेच त्यांची एकमेकांशी ओळख झाली, त्यानंतर ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रोहितच्या कुटुंबीयांचा मात्र या लग्नाला विरोध होता. सोनम दुसऱ्या धर्मातील असल्याने कुटुंबीयांनी तीव्र विरोध केला होता. रोहितने जर सोनमशी लग्न केले तर नातेसंबंध तोडू अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर रोहितने सोनमशी लग्न करुन तो तिच्यासोबत राहू लागला. गेल्या वर्षभरापासून तो त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात नव्हता.

परिवाराने मागितला न्याय

रोहिताच्या आईने आता सोनम आणि तिचा भाऊ अख्तर अली यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. रोहितने फाशी घेण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. रोहितच्या आईने या प्रकरणात दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. या तक्रारीनंतर आता सूरत पोलिसांनी या प्रकरणी सोनम आणि तिच्या भावाची चौकशी सुरु केली आहे.