दहशतवादी उमरच्या सुसाईड बॉम्बिंग व्हिडीओवर ओवैसींची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले इस्लाममध्ये…
दिल्लीच्या लाल किल्ला स्फोटाप्रकरणी असदुद्दीन ओवैसी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली आहे. या प्रकरणात डॉ. उमर याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Delhi Blast : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात i20 कारमध्ये मोठा स्फोट घडवून आणण्यात आला. पुढे तपासात हा दहशतवादी हल्लाच आहे, असे सष्ट झाले. स्फोटाच्या या घटनेत एकूण 15 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. याच प्रकरणात डॉ. उमर या दहशतवाद्याने आत्मघाती स्फोट घडवून आणल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या तपासात आता याच उमरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये उमर सुसाईड बॉम्बिंग योग्य असल्याचे बोलताना दिसत आहे. दरम्यान, आता याच व्हिडीओवर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
असदुद्दीन ओवैसी यांनी केले ट्वीट
ऑल इंडिया मसलिस ए इत्तेहाद उल मुसलमीन पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी इस्लामची शिकवण आणि डॉ. उमरचा व्हिडीओ यावर भाष्य केलं आहे. दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोप उमर नवी याचा एका कोणतीही तारीख नसलेला एक व्हिडीओ समोर आल आहे. या व्हिडीओत तो आत्मघाती हल्ला म्हणजे हौतात्म्य असल्याचा दावा कत आहे. तसेच आत्मघाती हल्ल्याला चुकीचे समजण्यात आले आहे, असेही तो या व्हिडीओमध्ये बोलताना दिसतोय. पण खरं पाहायचं झालं तर इस्लाममध्ये आत्महत्या ही हराम आहे. सोबतच निरापराध लोकांची हत्या करणे हेदेखील इस्लाममध्ये पाक आहे, असे असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. यासह आत्मघाती हल्ल्यासारखे कृत्य देशाच्या कायद्याच्या विरोधातील कृत्य आहे. डॉ. उमर नवी याने केलेले कृत्य हे दहशतवाद आहे. दुसरे काहीही नाही, असेही ओवैसी यांनी म्हटले आहे.
अमित शाहा यांच्यावर सडकून टीका
पुढे ओवैसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. ऑपरेशन सिंदू आणि ऑपरेशन महादेव यादरम्यान अमित शाहा यांनी गेल्या सहा महिन्यात कोणताही स्थानिक काश्मिरी नागरिक दहशतवादी समूहांशी जोडला गेलेला नाही, असे सांगितले होते. मग आता जी नावे समोर आली आहेत, ती कुठून आली? या दहशतवादी समूहाचा शोध न घेऊ शकण्याला कोण जबाबदार आहे? असा सवाही त्यांनी केला आहे.
“Suicide Bombing कोई शहादत नहीं है” Delhi Bomb Blast Case और मक्का मदीना बस हादसा पर AIMIM अध्यक्ष बैरिस्टर @asadowaisi की प्रेस कांफ्रेंस।
📌 दारुस्सलाम, हैदराबाद pic.twitter.com/hshiGhWITu
— AIMIM (@aimim_national) November 19, 2025
दरम्यान, दिल्ली स्फोटाप्रकरणी संस्थांकडून कसून तपास केला जात आहे. या प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यामुळे भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
