AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

National Film Awards: सरकारचा नवीन प्लॅन! राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आता पर्यटनस्थळांवर; अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा

चित्रपटांच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणाची ओळख निर्माण होऊ शकते, तर पर्यटनस्थळांवर मोठे फिल्म इव्हेंट आयोजित केल्याने त्या ठिकाणाला अतिरिक्त प्रसिद्धी मिळू शकते. त्यामुळे चित्रपट आणि पर्यटन यांचा संगम करण्याच्या या संकल्पनेतून पुढील काळात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देशाच्या विविध पर्यटनस्थळांवर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

National Film Awards: सरकारचा नवीन प्लॅन! राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आता पर्यटनस्थळांवर; अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा
national film awards Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 22, 2026 | 3:17 PM
Share

भारतीय सिनेसृष्टीतील प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळा आता केवळ राजधानी दिल्लीपुरता मर्यादित राहणार नाही. देशातील विविध राज्यांमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या उपक्रमाची माहिती देताना चित्रपट आणि पर्यटन या दोन क्षेत्रांना एकत्र आणण्यामागील संकल्पना स्पष्ट केली. 2026 चा 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातमधील एकता नगर, केवडिया इथं आज (22 सप्टेंबर 2026) रोजी आयोजित करण्यात आला आहे.

अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देशातील प्रमुख पर्यटनस्थळांपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकता नगर हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’मुळे जगभरात ओळखलं जाणारं पर्यटनस्थळ बनलं आहे. अशा ठिकाणी राष्ट्रपती, देशभरातील कलाकार आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर एकत्र आल्याने त्या ठिकाणाकडे देशाचं आणि जगाचं लक्ष वेधलं जाऊ शकतं, असं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक पातळीवर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. त्यांच्या मते, चित्रपट आणि पर्यटन यांचा संगम झाल्यास संबंधित पर्यटनस्थळाला प्रसिद्धी मिळण्यासोबतच स्थानिक पातळीवरील पर्यटन आणि आर्थिक उपक्रमांनाही चालना मिळू शकते. केंद्राच्या अधिकृत माहितीनुसार, भविष्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राजधानीबाहेरील प्रदेशांना राष्ट्रीय पातळीवरील या महत्त्वाच्या सोहळ्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

राज्यांना पर्यटनस्थळांसाठी प्रस्ताव देण्याचं आवाहन

अश्विनी वैष्णव यांनी सर्व राज्यांना त्यांच्या राज्यातील सर्वोत्तम पर्यटनस्थळांचा प्रस्ताव देण्याचं आवाहन केलं आहे. या प्रस्तावामध्ये उत्तम सुविधा आणि पर्यटनस्थळाच्या विकासाचा आराखडा असावा, असं त्यांनी म्हटलं. निवड झालेल्या राज्यातील पर्यटनस्थळी पुढील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आयोजित केला जाऊ शकतो. यामुळे पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या भागांची संस्कृती, निसर्ग, ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन क्षमता देशभरातील प्रेक्षकांसमोर आणण्याची संधी मिळू शकते.

वैष्णव यांनी यावेळी G20 आयोजनाचाही संदर्भ दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, G20 संबंधित कार्यक्रम देशाच्या विविध भागांमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्याच धर्तीवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारदेखील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये नेण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. दरम्यान, 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमध्ये 2024 मधील भारतीय सिनेमातील कामगिरीचा गौरव करण्यात येणार आहे. यंदाच्या सोहळ्यात विविध भारतीय भाषांमधील चित्रपट आणि कलाकारांचा सन्मान होणार असून, एकता नगरमधील आयोजन हे पुरस्कार सोहळ्याला दिल्लीबाहेर नेण्याच्या नव्या टप्प्याची सुरुवात मानली जात आहे.

Follow Us
युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...
Vishakha Raut : विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...; कोर्टने नेमके काय दिले आदेश?
सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण...
Video : सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण दुष्काळाची चिंता कायम
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली..
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली जबाबदारी
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... कारण काय?
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... नेमकं कारण काय?
कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर लक्ष
Maharashtra Farmer Issue : कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर राज्याचं लक्ष
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबतच्या भूमिकांवर श्वेता महालेंची टीका
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबत बदलत्या भूमिकांवर श्वेता महाले कडाडल्या; म्हणाल्या...
आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर...
Maratha Andolan : आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून...
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून सरकारला सुनावलं
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना मोठी हाक