AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेच्या सेमीफायनलसाठी आज मतमोजणी, सकाळी 11 वाजेपर्यंत स्पष्ट होणार चित्र

Assembly Election result 2023 | पाच पैकी चार राज्यांतील विधानसभेसाठी आज मतमोजणी सुरु झाली आहे. मेघालयाची मतमोजणी 4 डिसेंबर रोजी होणार आहे. ही पाच राज्यातील निवडणूक म्हणजे 2024 ची सेमीफायनल म्हटली जात आहे.

लोकसभेच्या सेमीफायनलसाठी आज मतमोजणी, सकाळी 11 वाजेपर्यंत स्पष्ट होणार चित्र
PM NARENDRA MODI AND RAHUL GANDHI
| Updated on: Dec 03, 2023 | 7:54 AM
Share

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरम या पाच राज्यांतील मतदान प्रक्रिया 30 नोव्हेंबर रोजी संपली. आता मेघालय वगळता इतर चार राज्यांचा आज निकाल आहे. मेघालयची मतमोजणी सोमवारी होणार आहे. ही पाच राज्यातील निवडणूक म्हणजे 2024 ची सेमीफायनल म्हटली जात आहे. यंदा एक्झिट पोलमध्ये संभ्रम असल्यामुळे कुठे कोणाची सत्ता येणार हे सकाळी 11 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. सकाळी सात वाजेपासून मतमोजणी सुरु होणार आहे.

राजस्थानमध्ये 200 जागा

राजस्थानमध्ये विधासभेच्या 200 जागा आहेत. त्यापैकी 199 जागांवर मतदान झाले आहे. काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळे एका जागेवर मतदान झाले नाही. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा गेल्या 25 वर्षांपासून आहे. यंदा काय होणार? हे आज स्पष्ट होणार आहे.

मध्य प्रदेश विधानसभेसाठी 230 जागा

मध्य प्रदेश विधाससभेच्या 230 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. मध्य प्रदेशात यंदा 66 वर्ष जुना विक्रम मोडला गेला आहे. मध्य प्रदेशात 76.22 टक्के मतदान झाले. यामुळे आता कमल की कमलनाथ हे आजच स्पष्ट होणार आहे.

छत्तीसगडमध्ये 90 जागा

छत्तीसगड विधानसभेसाठी 90 जागांवर मतदान झाले. छत्तीसगडमध्ये 2018 नंतर 15 वर्षांनी काँग्रेस सत्तेत आली. भाजपने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर न करता निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे भूपेश बघेल पुन्हा सत्ता मिळवण्याचा चमत्कार करणार काय? हे आज स्पष्ट होणार आहे.

तेलंगणात 119 जागा

तेलंगणात विधानसभेसाठी 119 जागांवर मतदान झाले. या ठिकाणी के.चंद्रशेखर राव याचा बीआरएस पक्ष पुन्हा सत्तेत येणार की काँग्रेस हे आज स्पष्ट होणार आहे. या ठिकाणी भाजपनेही सर्व जागांवर उमेदवार दिले होते. परंतु भाजपला दुहेरी आकडा गाठणे अवघड आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.