ब्लॅक फंगसला महामारी घोषित करा, औषधांचा साठाही उपलब्ध करा; सोनिया गांधींचं मोदींना पत्रं

देशात ब्लॅक फंगसचा कहर वाढत आहे. अशावेळी बाजारात ब्लॅक फंगसच्या औषधांचा पुरेसा साठा नाहीये. (Assure supply of medicines for black fungus: Sonia Gandhi)

ब्लॅक फंगसला महामारी घोषित करा, औषधांचा साठाही उपलब्ध करा; सोनिया गांधींचं मोदींना पत्रं
sonia gandhi
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 2:06 PM

नवी दिल्ली: देशात ब्लॅक फंगसचा कहर वाढत आहे. अशावेळी बाजारात ब्लॅक फंगसच्या औषधांचा पुरेसा साठा नाहीये. त्यामुळे या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्या, अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. तसेच ब्लॅक फंगसला महामारी घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. (Assure supply of medicines for black fungus: Sonia Gandhi)

सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना पत्रं लिहून ही मागणी केली आहे. केंद्र सरकारने ब्लॅक फंगस महामारी घोषित करावी. हा आजार झालेल्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार करण्यात यावेत. तसेच या आजाराचा आयुष्यमान भारतसह इतर आरोग्य विमा योजनांमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. एम्फोटेरिसिन-बी हे औषध ब्लॅक फंगसवर उपयुक्त आहे. परंतु, सध्या बाजारात या औषधाची कमतरता आहे. त्यामुळे हे औषध मिळण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्यात यावीत, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

‘त्या’ मुलांची जबाबदारी घ्या

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून सोनिया गांधी वारंवार मोदींना पत्रं लिहून अनेक सूचना करत आहेत. ज्या मुलांनी कोरोनामुळे आई किंवा वडिलांना गमावलं. किंवा दोघांनाही गमवालं. अशा मुलांना नवोदय विद्यालयात मोफत शिक्षण देण्याचा विचार करण्याचं आवाहन सोनिया यांनी नुकतंच मोदींना केलं होतं. या मुलांना शिक्षण देणं राष्ट्र म्हणून आपली जबाबदारी आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.

जुलैपासून ब्लॅक फंगस औषधाचा अधिक साठा

दरम्यान, ब्लॅक फंगसवर उपयुक्त असलेल्या एम्फोटेरेसिन-बी औषधाच्या उत्पादनासाठी आणखी पाच कंपन्यांना लायसन्स दिलं आहे. जुलैपासून दर महिन्याला या औषधांचे 1,11, 000 डोसचं उत्पादन सुरू होईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारीच स्पष्ट केलं आहे. (Assure supply of medicines for black fungus: Sonia Gandhi)

संबंधित बातम्या:

बापरे! लहान मुलांनाही ब्लॅक फंगसची लागण; अहमदाबादमध्ये 13 वर्षाच्या मुलावर शस्त्रक्रिया

Black Fungus : ब्लॅक फंगसला प्रतिबंध करण्यासाठी फोलो करा या 3 सोप्या टिप्स

महाराष्ट्राने कधीही कोरोनाची आकडेवारी लपवली नाही, त्यामुळे देशपातळीवर उत्तम काम : राजेश टोपे

(Assure supply of medicines for black fungus: Sonia Gandhi)

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.