राम मंदिरातील व्हायरल मूर्ती खरी आहे का ? मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी स्पष्टच सांगितले

Ram Mandir Inauguration | अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्व तयारी सुरु असताना दोन दिवसांपासून राम मंदिरातील मूर्ती व्हायरल होत आहे. अरुण योगीराज यांनी बनवलेली आणि गर्भगृहात ठेवलेली हिच मूर्ती असल्याचा दावा सोशल मीडियात होत आहे. त्यावर आचार्य सत्येंद्र दास यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राम मंदिरातील व्हायरल मूर्ती खरी आहे का ? मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी स्पष्टच सांगितले
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 8:22 AM

अयोध्या, दि.21 जानेवारी 2024 | अयोध्येत प्रायश्चित्त पूजनाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मंगळवारी सुरुवात झाली. आता आज सकाळी मध्याधिवास तर संध्याकाळी शय्याधिवास होणार आहे. अयोध्येत ही सर्व तयारी सुरु असताना दोन दिवसांपासून राम मंदिरातील मूर्ती व्हायरल होत आहे. अरुण योगीराज यांनी बनवलेली आणि गर्भगृहात ठेवलेली हिच मूर्ती असल्याचा दावा सोशल मीडियात होत आहे. आता यासंदर्भात श्रीराम मंदिरातील मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी स्पष्टच सांगितले आहे. व्हायरल फोटोसंदर्भात नाराजी व्यक्त करत ते म्हणाले गर्भगृहात मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. ही मूर्ती कपडयांनी झाकली गेली आहे. मूर्तीचे डोळ्यावरील पट्टी प्राणप्रतिष्ठेपूर्वी काढली जात नाही. आचार्य सत्येंद्र दास यांच्या या स्पष्टीकरणामुळे व्हायरल मूर्ती दुसरीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हायरल फोटो चुकीचा

रामलल्लाच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यासंदर्भात आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटले की, अयोध्येतील मंदिरासाठी तीन मूर्ती तयार करण्यात आल्या. त्यानंतर एका मूर्तीची निवड झाल्यावर त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. ही पट्टी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी काढली जात नाही. फोटोमध्ये जी मूर्ती दाखवली जात आहे, ती गर्भगृहातील मूर्ती नाही. त्या मूर्तीचा फोटो मिळू शकत नाही. जर व्हायरल मूर्तीचा फोटो तोच असेल तर या प्रकरणाचा तपास करण्यात येईल. प्राणप्रतिष्ठापूर्वी श्रृंगार होऊ शकतो. पूजाअर्चा केली जाऊ शकते. तसेच मूर्तीचा इतर भाग उघडला जातो. परंतु प्रभूचे डोळे उघडले जात नाही.

हे सुद्धा वाचा

रामलल्लाची मूर्ती बालक स्वरुपातील

रामलल्लाची मूर्ती बालक स्वरुपातील आहे. शुक्रवारी संपूर्ण विधीविधानासह ही मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात आली होती. कर्नाटकातील मूर्तीकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती बनवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. त्यानंतर मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यात येणार आहे.

रामलल्लाची मूर्ती 51 इंच आहे. भक्तांना मूर्तीचे दर्शन 35 फूट लांब उभे राहून घेता येणार आहे. मूर्तीचे वजन जवळपास दीड टन आहे. संपूर्ण कृष्णशिळेतून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. मूर्तीवर जलस्नान किंवा दूध स्नान केल्यास काही परिणाम होणार नाही, हे लक्षात ठेवण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.