AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

By Election Results 2022 : बंगालमध्ये पुन्हा TMC चे पारडे जड, बाबुल सुप्रियो 9105 मतांनी आघाडीवर, बाबुलच ‘सुप्रीम’

By Election Results 2022 : एक लोकसभा आणि चार विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल (By Election Results 2022) आज घोषित केले जातील. शनिवार, १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांच्यामुळे रिक्त झालेल्या बंगालच्या आसनसोल लोकसभेच्या जागेचाही समावेश आहे. याशिवाय छत्तीसगड, महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी एका विधानसभेच्या […]

By Election Results 2022 : बंगालमध्ये पुन्हा TMC चे पारडे जड, बाबुल सुप्रियो 9105 मतांनी आघाडीवर, बाबुलच 'सुप्रीम'
टीएमसीचे उमेदवार बाबुल सुप्रियोImage Credit source: TV9
aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Apr 16, 2022 | 11:19 AM
Share

By Election Results 2022 : एक लोकसभा आणि चार विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल (By Election Results 2022) आज घोषित केले जातील. शनिवार, १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांच्यामुळे रिक्त झालेल्या बंगालच्या आसनसोल लोकसभेच्या जागेचाही समावेश आहे. याशिवाय छत्तीसगड, महाराष्ट्र आणि बिहारमधील प्रत्येकी एका विधानसभेच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकालही येतील. बाबुल सुप्रियो यांनी गेल्या वर्षी आसनसोल लोकसभा मतदारसंघातून राजीनामा दिला होता. बाबुल सुप्रियो यांनी भारतीय जनता पार्टी (BJP) मधून तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आसनसोलच्या खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्याच वेळी, बालीगंगेचे प्रतिनिधित्व करणारे राज्यमंत्री सुब्रत मुखर्जी यांचे गेल्या वर्षी निधन झाले. या कारणांमुळे या दोन्ही जागांवर मतदान झाले. बालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत बाबुल सुप्रियो यांना आतापर्यंतच्या मतमोजणीत 13000 मते मिळाल्याचे समोर येत असून ते आघाडीवर असल्याचे कळत आहे.

आसनसोलमध्ये मतमोजणी

दरम्यान, आसनसोल लोकसभा जागेसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. आसनसोलच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या जागेवरून शत्रुघ्न सिन्हा आणि अग्निमित्रा पॉल यांच्यात चुरशीची लढत आहे. बालीगंगेमध्ये पहिल्या फेरीच्या मतमोजणीत टीएमसीचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांनी आघाडी घेतली होती. बाबुल सुप्रियो 9105 मतांनी आघाडीवर आहेत. बाबुल सुप्रियो यांना आतापर्यंतच्या मतमोजणीत 18874 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या कमरुझमान चौधरी यांना 3047, भाजपच्या काया घोष यांना 1744 आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सायरा शाह हलीम यांना 9769 मते मिळाली.

पहिल्या फेरीतच आघाडी

बाबुल सुप्रियो यांनी 2170 मतांनी आघाडीवर होती. बाबुल सुप्रियो भाजप सोडून गेल्या वर्षी टीएमसीमध्ये दाखल झाले. त्यानंतर आता बाबुल सुप्रियो यांना आतापर्यंतच्या मतमोजणीत 13000 मते मिळाल्याचे समोर येत असून ते आघाडीवर असल्याचे कळत आहे. तर याच्या आधी ते 4676 मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसच्या कमरुझमान चौधरी यांना 2186, भाजपच्या काया घोष यांना 621 आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सायरा शाह हलीम यांना 5075 मते मिळाली. दरम्यान, या पोटनिवडणुकीत टीएमसीचे उमेदवार बाबुल सुप्रियो 6295 मतांनी आघाडीवर आहेत. बाबुल सुप्रियो यांना आतापर्यंतच्या मतमोजणीत 13000 मते मिळाली आहेत. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सायरा शाह हलीम यांना 6705 मते मिळाली.

शत्रुघ्न सिन्हा 34430 मतांनी आघाडीवर

आसनसोलमधून टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा 34430 मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत शत्रुघ्न सिन्हा यांना 103089 मते मिळाली आहेत, तर भाजपच्या अग्निमित्र पाल यांना 68659 मते मिळाली आहेत. याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पार्थ मुखर्जी यांना 15977 मते मिळाली आहेत.

दरम्यान महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल ही हाती येत आहे. येथे काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना तेराव्या फेरीत 50807 मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम यांना 39628 मते मिळाली. सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. जयश्री जाधव 11 हजार 179 मतांनी आघाडीवर आहेत.

इतर बातम्या : 

Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिश्चार्ज, प्रकृती चांगली असल्याची डॉक्टरांची माहिती

Kolhapur North By Election 2022 : सलग तीन फेऱ्या भाजपच्या नावावर, मविआच्या जयश्री जाधवांना विजय खडतर होणार?

Neelam Gorhe | पंढरपूरच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरची विकासकामे होणार, विधानसभा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंची ग्वाही

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार